ग्रा. प. अर्हेर-नवरगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने महिला सन्मानित

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 1 जून):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पंचायत अर्हेर-नवरगाव येथे महिलांना पुरस्कार देण्यात आले. सौ . वंदना राजेंद्र मेश्राम व सौ. अश्विनी विकास बठे या दोन महिलांना सरपंच सौ.दामिनी जागेश्वर चौधरी व सचिव रतीरामजी चौधरी ग्रा.प सदस्या सौ.येशूका कुथे, सुनिता मडावी व अंगणवाडी मदतनीस, सेविका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार ग्राम पंचायत क्षेत्रातील दोघा कर्तबगार
महिलांचा सन्मानासाठी असून महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ही पुरस्कार योजना राबविण्यात अली आहे. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने या पुरस्कारांचे सर्वत्र गावपातळीवर वितरण करण्यात आले आहे. दरवर्षी जयंतीदिनी हे पुरस्कार वितरित करण्याचे निर्देश महिला, बाल विकास विभागाने दिले असून, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, 500 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.