फक्त प्राथमिक शिक्षक लेखकांसाठी आवाहन

30

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.9जून):- शेवगाव येथील राम दादा गोसावी गुरुजी व राहुरी फॅक्टरी येथील त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी या शिक्षक बंधूंच्या स्मरणार्थ वॉरियर्स फाउंडेशनच्या वतीने लेखक असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या साहित्यकृतीचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती वॉरियर्स फाउंडेशनच्या सचिव सौ. संगीता बबनराव गिरी यांनी दिली.

वॉरियर्स फाउंडेशन च्या अध्यक्षा कवयित्री शर्मिला गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आलेला असून प्राथमिक शिक्षक असलेल्या लेखक,कवींनी १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती,परिचय सौ. संगीता गिरी, गिरीराज, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर ४१४००३ मो क्र.९३२५१०७५८८ येथे पाठवावेत.

सदर पुरस्कारासाठी कथासंग्रह, कादंबरी,आत्मचरित्र,काव्यसंग्रह व संकीर्ण प्रकारातील पुस्तकांचा विचार केला जाणार असून पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.तरी साहित्यिक असलेल्या प्राथमिक शिक्षकांनी आपल्या साहित्य कृती या पुरस्कारासाठी पाठवाव्यात असे आवाहन सौ.आरती गिरी, साहिल पठाण, श्रीमती भामा गोसावी, सौ.अनिता कानडे, प्रशांत वाघ, दिशा गोसावी व नेहा शेख यांनी केले आहे.