निबंधक इंदिरा अस्वार यांच्या माध्यमातून बार्टी बंद करण्याचा भाजप, राष्ट्रवादीचा अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळेच योजनांना रखडल्या

30

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.12जून):-येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात सध्या हिटलरशाही दिसून येत आहे. वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार व त्यांच्या समर्थकांच्या बेबंद हुकुमशाहीमुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याच्या अनेक योजना रखडल्या आहे. परिणामी गेल्या दिवसापासून अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे बार्टी बदनाम झाली आहे. इंदिरा अस्वार यांना हटविण्याची मागणी करूनही भाजप सरकार काहीही करीत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच बार्टी बंद करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतावादी विचार घराघरांत पोहोचून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य करण्यासाठी बार्टीची स्थापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या बार्टीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून हुकूमशाही सुरू असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजना या अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे रखडल्या आहेत. बार्टी येथील वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांच्या विरोधात तक्रारीचा पाऊस असूनही वरिष्ठ अधिकारी त्यांचा बचाव करीत आहेत. त्यांच्यावर विभागीय चौकशीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून तो मुख्यमंत्र्याच्या दरबारी पडून आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात आपली ‘सेटिंग’ असल्याचे सांगून इंदिरा अस्वार बार्टीमध्ये वाट्टेल ते निर्णय घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. वादग्रस्त संस्थांना स्पर्धाचे परीक्षेचे कंत्राट देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यातून अनेक छुपे व्यवहार होत असल्याची चर्चाही सोशल मीडियावर होती. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांना आंदोलन केले. तसेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहायक सचिव दिनेश डिंगळे यांनाही निवेदन दिले. त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले. मात्र, यापैकी कोणत्याही अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाईचे पत्र दिले नाही. आपण कुणालाही जुमानत नाही, असे समजून बार्टीत धिंगाणा घालण्यापर्यंत मजल गेली आहे. निबंधक इंदिरा अस्वार यांच्यामुळे बार्टीची सामाजिक प्रतिमा मलिन झाली असून योजनांचा अंलबजावणी कमी आणि वादग्रस्त निर्णय अधिक असे येथे दिसून येत आहे.

*बार्टीला बदनाम करण्यासाठी नियुक्ती*
गेल्या अनेक वर्षांपासून बार्टीने आपले काम योग्यरितीने केले आहे. त्यामुळे बार्टीच्या योजनांपासून सारथी आणि महाज्योतीसारख्या संस्थांची निर्मिती करण्यात आली. सारथी आणि महाज्योतीच्या योजना सुरू असून हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. बार्टीच्या योजना आणि काम पाहून सुरू झालेल्या संस्था पुढे जात आहेत. तर बार्टीची पत घालविण्यात निबंधक इंदिरा अस्वार आणि त्यांचे समर्थक कोणतीही कसर सोडत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वेषातूनच हा प्रकार होत आहे. बार्टीला बदनाम करून बंद करण्यासाठी निबंधकांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. यात भाजप समर्थित राज्य सरकारच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचीही चर्चा आहे.

*योजना फक्त कागदावरच*
👌🏽इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट या प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) योजना गेल्या दोन-तीन वर्षांपासून कागदावरच आहे. सुरवातीला या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर योजनेत बदल करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अद्याप या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या सारथी, महाज्योती यांसारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून पुढील प्रवेश परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. ‘बार्टी’च्या माध्यमातूनही इयत्ता दहावीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील आणि जेईई, नीट या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली. मात्र, अद्याप ही योजना प्रत्यक्षात राबविण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकलेला नाही.

*बौद्धांच्या द्वेषातून कर्मचाऱ्यांनाही केले टारगेट*
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या बौद्ध समाजातील कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार बार्टीत सुरू आहे. यासंदर्भात अनेक निवेदन देण्यात आले. मात्र, सरकारही त्यावर काहीच करीत नाही. तर विरोधी पक्षसुद्धा त्यावर काही बोलायला तयार नाही. राज्यात एकूणच बौद्धांविरोधात वातावरण तयार करण्यासाठी बार्टीचा उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी कार्यशाळेत धार्मिक कार्यक्रमांचा धिंगाणा घालण्यात आला होती. यामागील सूत्रधार निबंधक इंदिरा अस्वार आणि त्यांनी नियुक्ती केलेली कर्मचारी नसरीन तांबोळी असल्याचे समोर आले. महासंचालक वारे यांनी माफी मागून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला असला तरी दोषींवर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी केली नाही. महासंचालक वारे यांची नियुक्ती आपणच केल्याचा तोरा हे अधिकारी मिरवीत असल्याची चर्चा असून त्यामुळे महासंचालक वारे त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचे उघड झाले आहे.

*राष्ट्रवादीच्या आमदाराचे पाठबळ*
बार्टीला बदनाम करून बंद करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका आमदाराचा हात असल्याची चर्चा आहे. हा आमदार निबंधकांना पाठबळ देत असून त्यांच्यामुळे येथे सावळा गोंधळ सुरू आहे. राष्ट्रवादी पदाधिकारी बौद्ध नेत्यांना पक्षात घेण्यासाठी पुढाकार घेत असले तरी हा आमदार बौद्धांविरोधात कारवाईत भरपूर सहकार्य करीत आहे. यातून काही माजी अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार या आमदाराने केला आहे. राष्ट्रवादी पक्षाविरोधात आंबेडकरी समाजात नाराजीचा सूर असून या आमदाराला वठणीवर आणावे, अन्यथा निवडणुकीत हिसका दाखवू, अशी चर्चाही सुरू आहे.