नवीन शैक्षणिक धोरण 2020 सामान्यांच्या शिक्षण हक्काविरोधात जनव्यापी शिक्षण चळवळीची गरज-डॉ. शरद जावडेकर

38

✒️अंबाजोगाई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अंबाजोगाई(दि.12जून):-नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे केंद्र सरकारने लागू केले. परंतु नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसामान्य, गरीब, सामान्य समाजातील घटक यांना उच्च शिक्षण नाकारणारे आहे. धनदांडग्यांचे रक्षण करणारे आहे. शिक्षण हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमुळे शैक्षणिक विषमता निर्माण होईल. त्यामुळे हे धोरण हाणून पाडले पाहिजे आणि यातील समाजहिताविरोधी घटकांबाबत जनव्यापी शिक्षण चळवळ उभी करावी लागेल असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ.शरद जावडेकर यांनी व्यक्त केले.

अ.भा.शिक्षण हक्क सभा, पुणे अंबाजोगाई शाखेव्दारे आयोजित शिक्षणाचा हक्क व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर परिसंवादात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. या व्याख्याना दरम्यान त्यांनी अभास शिक्षण हक्क सभेच्या कार्याची माहिती सांगताना के.जी.इ टू पी.जी मोफत शिक्षण, सर्व शिक्षण संस्थाना शासकीय अनुदान, सर्वांना किफायतशीर व दर्जेदार शिक्षण ही उद्दिष्ट स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्रितम पन्हाळे सर तर प्रमुख उपस्थिती सर नागेश जोंधळे यांची होती.

डॉ.मोरे क्लासेस अंबाजोगाई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सुनिल भोसले यांच्या शिक्षण चळवळीच्या क्रांतीकारी गिताने करण्यात आली. श्री.प्रितम पन्हाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सद्यस्थितीतील ग्रामीण शिक्षणातील विविध समस्यांचे स्वरूप आणि त्यावरील अनुभवरूपी विचार व्यक्त केले. तसेच श्री.नागेश जोंधळे यांनी शिक्षण क्षेत्रातील नवनविन आव्हाने व त्यावरील उपायांची ब्ल्यु प्रिंट तयार करून ही शैक्षणिक चळवळ गतीमान करावी असे मत व्यक्त केले.
या परिसंवादानंतर झालेल्या प्रश्नोत्तरे सदरात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक अभ्यासू मान्यवर व्यक्तीनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

डॉ. मोरेज क्लासेसचे संचालक डॉ.दत्ता मोरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन व संयोजनाची जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हेमंत धानोरकर यांनी केले. तसेच श्री.राजकुमार साळवी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास बी के. मसने, श्रीमती सुनंदा मसने श्री योगेश सुरवसे , डॉ.एम.व्ही.कानेटकर, प्रा.आनंत कांबळे,प्रा.संजय गायकवाड,सुहास चंदनशीव , प्रशांत मस्के, प्रा.आमोल राजपंखे,गोविंद जोगदंड , नागनाथ जोंधळे, नामदेव गुंडाळे, प्रा. राजकुमार थोरात, डॉ. विनायक गडेकर, डॉ. भाबरदोडे, श्री डोरले सर, डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे,प्रा.राम शेप,श्री.शरद शिंदे ,श्री.विकास होणमाने तारका वानखडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.