राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सव 18 जूनला

38

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.14जून):-आर्यारवी एंटरटेनमेंट, मुंबई, निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सव रविवार दि. 18 जून, 2023 रोजी दुपारी 12:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती बाल आयोजक आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, तक्ष उराडे, अनघा सुतार, कनिष्का खोबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, विद्रोही शाहीर संभाजी भगत, सिनेअभिनेते अभिजित बिचुकले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर, धम्म अभ्यासिका विजया कांबळे, धम्मलिपीच्या अभ्यासिका छाया पाटील, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, बालनाट्य अलबत्या गलबत्या फेम सागर सातपुते, फोटोग्राफर राजवीर जाधव, अमर पारखे, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिवसभर चालणाऱ्या या महोत्सवात मुजरा, अंतरंग, बुद्धा या लघुपटासह विविध भागातील विविध विषयावरील लघुपट दाखवले जाणार आहेत. यावेळी बाल कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे जीवन उलघडणार आहेत.

राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सव मुख्य आयोजन बाल आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, आर्य तेटांबे, तक्ष उराडे, अतिफ काझी, शाहू पाटील, प्रांजल सुरवशी, स्वरा सामंत, श्रावस्ती तामगाडगे, कोमल लांडगे, श्रीजा पाटील, अनघा सुतार, कनिष्का खोबरे, स्वराज किरवेकर, पुष्कर कुसूरकर, स्वरल नामे, इझयान मुरसल, शौर्या देसाई, हृद्वी पवार, अवंती मोखले, भक्ती भस्मे, भूमी , सिद्धांत महापुरे, अन्वय म्हमाने, ऋतुजा शिंदे, वेणू तिप्पाण्णावर, पृथ्वीराज वायदंडे यांनी केले असून सहकार्य अनिरुद्ध कांबळे, स्नेहल माळी, अरहंत मिणचेकर, नामदेव मोरे, अनुष्का माने यांनी केले आहे.

राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवास राजर्षी शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाल कलाकार स्वरल नामे, वेणू तिप्पाण्णावर आणि मंथन जगताप केली आहे.