मातोश्री पाणंद रस्त्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडुन दिशाभूल; पावसाळ्यात रस्ते करणार कसे?? – डॉ.गणेश ढवळे

25

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.14जून):-राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकताच एक आदेश काढुन राज्यातील पाणंद रस्त्यांना दर्जावाढ देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी व त्यासाठी जिल्हा परीषद बांधकाम विभाग आणि पंचायत समितीचा वित्त आयोगाचा निधी मिळण्याचा मार्ग खुला झाला असला तरी बीड जिल्ह्यामध्ये अडीच हजार पांदण रस्ते आतापर्यंत करण्यात आलेले आहेत ही दैनिकांना पुरवलेली माहीती दिशाभूल करणारी आणि खोडसाळ पणाची आहे.आणि वर्षभरापासून मंजूर झालेले रखडलेले रस्ते पावसाळ्यात पुर्ण करणार कसे हा खरा प्रश्न असुन गुत्तेदार आणि कार्यकर्ते पोसण्यासाठी बीड जिल्ह्यात नरेगाच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले.

मात्र नरेगाच्या कामावरील मजुरांची दोन वेळा उपस्थिती लावण्याच्या निर्देशानंतर आता या कामावर काम करायला मजुर तयार नसल्याने मंजूर करण्यात आलेल्या हजारो रस्त्यापैंकी एकही पाणंद रस्ता आतापर्यंत पुर्ण झालेला नाही.त्यामुळे जिल्हा प्रशासन चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहे.

पाणंद रस्तेकाम पावसाळ्यात करणार कसे??? शासन परिपत्रकात नमूद

शेत/पाणंद रस्त्याची कामे पावसाळ्यात करणे अडचणीचे असते.सदर कामांना खरीप हंगाम काढणी नंतर सुरूवात केल्यास कामे विनाखंड पुर्ण करता येऊ शकतात ही बाब विचारात घेऊन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे उन्हाळाचा कालावधी उपयोग करून घेणे आवश्यक आहे.आर्थिक वर्षांमध्ये प्रारंभ पासुन शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणे पुर्व अट आहे. असे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत शासन परिपत्रकात नमुद केलेले आहे.

बीड जिल्ह्यात २४९६ रस्ते मंजूर,२८७५ कि.मी.रस्त्याचा समावेश ,मानिटरींग अँप हजेरीमुळे काम रखडले

मातोश्री शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत बीड जिल्ह्यात २४९६ रस्ते मंजूर केलेले असुन एकुण २८७५ किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.मात्र केंद्र सरकारने मोबाईल मानिटरींग अँपने हजेरी सुरू केलेली आहे.सदरील हजेरीसाठी सार्वजनिक कामांसाठी दिवसातून दोनदा मजुरांचे फोटो काढावे लागत असल्याने कामांवर मजुर दाखवणे अवघड झालेले आहे त्यामुळे मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांची मंजूर कामे रखडलेलीच आहेत.

लोकवर्गणीतून रस्ते करण्याची ग्रामस्थांवर वेळ

शेतवस्त्या आणि पाणंद रस्त्यांची जिल्यात मोठी समस्या असुन सदरील कामे मातोश्री शेत/पाणंद योजनांमधून करण्यासाठी सरपंच,गाव पुढा-यांनी मंत्र्यापर्यंत “वजन”वापरल्याची चर्चा आहे.परंतु आता मोबाईल मानिटरींग अँप मुळे मजुरांची हजेरी घेणे अवघड झाले आहे मंजूर रस्त्याची कामे किचकट नियमांमुळे सुरू करता येत नसल्याने अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी पावसाळ्यात गुडघ्याईतका चिखल तुडवत मुलांच्या शाळा,दुधदुभती, बाजारहाट,बि -बियाणे, शेतीमाल यांची आवक जावक करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून रस्ता करण्याचे प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश तसे महाजनवाडी आदि गावात आढळून आले आहेत.

Previous articleकटोरा दांव!
Next articleTelangana Chief Minister K. Chandrasekhar Rao in Nagpur on June 15
पुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी ! संपादक/प्रकाशक के Whats App नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है ! - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी