पुसेगाव ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार-विशाल जाधव

31

✒️सातारा/ खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

पुसेगाव(दि.17जून):-तालुका खटाव जिल्हा सातारा येथील ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच विजय मसणे व ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी संगनमत करून अंगणवाडी साहित्य खरेदीत सुमारे ७ ते ८ लाखांचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी तक्रारदार विशाल जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

विशाल जाधव यांनी दिलेल्या निवेदनात व प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पुसेगाव ग्रामपंचायतीने सन २०२०-२१, २१-२२ व २२-२३ या आर्थिक वर्षामध्ये शिक्षण विभागाच्या हेडमधून १२ अंगणवाडी व २ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी जीईएम पोर्टलवरून सनशाईन एंटरप्राईजेस प्रा. लि. कराड यांच्यांकडून ११ लाख ४५ हजारांची शैक्षणिक साहित्यांची खरेदी केली.

ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी व शाळांना जीईएम पोर्टलनुसार खरेदी केलेले शैक्षणिक साहित्य मिळाले आहे. का? याची प्रत्यक्षदर्शिनी पाहणी व विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित….

विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण व चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निधी दिला जातो. मात्र, पुसेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विजय मसणे व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्यामध्ये भ्रष्टाचार केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे तक्रारदार ग्रामस्थ विशाल जाधव यांनी सांगितले,

लेखी माहिती घेतली असता तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संगनमत करून ११ लाख ४५ हजारांच्या खरेदी केलेल्या साहित्यापैकी साधारणपणे अडीच ते तीन लाखांचे साहित्यच प्रत्यक्षात शाळांना दिले आहे. तेही अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे आहे..

ग्रामपंचायतीकडून १२ अंगणवाडी व २ शाळांना कोण-कोणते साहित्य मिळाले आहे, याची प्रत्यक्षदर्शिनी पाहणी करून फोटो व व्हिडीओ काढले आहेत. साहित्याबाबतचे सर्व शाळांकडून लेखी तपशील घेतले आहेत, अशी वस्तुस्थिती असताना ग्रामपंचायतीने संबंधित एजन्सीचे १०० टक्के बिलसुद्धा चेकद्वारे अदा केले आहे. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी व सनशाईन एंटरप्राईजेस प्रा. लि. कराड यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

ग्रामपंचायतीकडे ज्या-ज्या मागण्या संबंधित अंगणवाडीच्या आल्या होत्या. त्या- त्या आम्ही मान्य करून त्यांना सर्व साहित्य दिले आहे. त्याच्या सर्व पावत्या व बिले सादर केली आहेत. मात्र खोटे आरोप करून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला जात आहे.*
*विजय मसणे, तत्कालीन सरपंच,पुसेगाव*