चोरीस गेलेला मुद्देमाल फिर्यादीस वडूज पोलिसांमार्फत परत

33

✒️सातारा/ खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:9822800812

खटाव(दि.17जून):-वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा पोलीस स्टेशन गुन्हयातील चोरीतील जप्त मुद्देमाल मा. अजय कोकाटे परी पोलीस उपअधीक्षक वडूज पोलीस ठाणे यांचे हस्ते फिर्यादीस परत करण्यात आला.

वडूज पोलीस ठाणे २०२२ रोजी वडूज, पेडगांवरोड येथील राहते घरातून दिवसा घरफोडी करून एकूण ५ लाख ४ हजार असा मुद्देमाल चोरीस गेला होता. तद्नंतर पोलीसांनी तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणून संबंधीत आरोपीतांचेकडून एकूण ४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला होता.

तरी यातील फिर्यादीनामे कृष्णा विठोबा करमारे रा वडूज ता खटाव जि सातारा यांनी तक्रार दिली होती. यातील तक्रारदार यांचा गुन्हयातील रिकवर मुद्देमाल जप्त मुद्देमाल ) आजरोजी मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली, मा. आश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहिवडी, मा. अजय कोकाटे परी पो. उप अधीक्षक वडूज पोलीस ठाणे, मा. अमोल माने सपोनि वडूज पोलीस स्टेशन, पोहवा प्रतिभा कदम वडूज पोस्टे यांचे उपस्थितीत मा. अजय कोकाटे परी पोलीस उपअधीक्षक वडूज पोलीस स्टेशन यांनी एकूण ४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल परत दिला. फिर्यादी व ग्रामस्थ यांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले