अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालक समिती निर्माण करावी

37

🔹गटशिक्षणाधिकारी साहेब,पंचायत समिती उमरखेड यांना निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि.20जून):- शहरातील सर्व उर्दु शाळेमध्ये पालक समिती स्थापण करते वेळेस वि.आर.सी. चे 2 अधिकारी, नगर परिषदचे 2 अधिकारी यांचे उपस्थितीत पालक समिती गठीत करण्यात यावी.

उमरखेडचे सर्व उर्दु शाळेमधील मुख्याध्यापक आपली मनमाणी कारोबार करत आहेत.पालक समितीची स्थापना वि.आर. सी नगर पालिका याचे पदाधिकात्यांच्या उपस्थितीत यावी.

उमरखेड येथील सर्व उर्दु शाळेचे मुख्याध्यापक स्वतः ची मनमानी करत आहे.

गटशिक्षणाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष देऊन आपले उपस्थिती मध्ये पालक समितीची स्थापणा करावी.

पालक समितीची स्थापणा करते वेळेस कोणतेही मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहु नये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (पीएम-पोषण) या योजनेचा उमरखेड उर्दु शाळेचे मुख्याध्यापक दुरुपयोग करत आहेत.

विद्यार्थ्यांना कोणताही फायदा या योजनेचा मिळत नाही.
पालक समितीचे अध्यक्ष निवडताना मुख्याध्यापक आपली स्वतः ची मनमाणी करून पालक समितीचे अध्यक्ष ते स्वतः निवडत होते गटशिक्षणाधिकारी साहेबांनी आपल्या उपस्थितीमध्ये पालक समितीची स्थापणा करावी.
ही नम्र विनंती.

निवेदन देताना पत्रकार सुनील ठाकरे, संपादक उमरखेड वार्ता शेख इरफान व पत्रकार अशोक गायकवाड आदि उपस्थित होते.