घुग्घुस लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगातील अस्थायी कामगाराचे वेतन करार

37

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.23जून):- लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापक व भारतीय लाइट्स मेटल कामगार संघ यांच्यात अस्थायी कामगाराचे वेतन करार व परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) करार मागील १५ महिण्यापासुन सविस्तर चर्चात्मक बैठक सुरू होती.

दि.२० जून २०२३ मंगळवार रोजी परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA),वेतन करार संपुष्टात आले,व परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA)करार दि.१ एप्रिल २०२४ पासुन लागू होईल.पुढील ५ वर्षांकरिता म्हणजेच २०२४ ते २०२९ पर्यंत राहील.

या बैठकीत भा.ला.मे.का.सं.घुग्घुस अध्यक्ष मा.श्री.देवराव निंदेकर,संघटक मंत्री श्री.अशोकराव मांडवकर, कार्याध्यक्ष श्री.प्रमोद येलचलवार, महामंत्री हिवराज बागडे, संयुक्त महामंत्री राजास्वामी जंगम तसेच कंपनीचे मानव संसाधन उपाध्यक्ष मा.श्री. पवन मेश्राम, सीएसआर व्यवस्थापक मा.श्री. तरूण केसवाणी, प्रितम आगदारी तसेच वेतन करार सदस्य कार्यकारणी उपस्थित होते.