गडचिरोली येथे महा अंनिस तर्फे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23जून):- गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विभागवार उपक्रमाविषयी माहिती व्हावी व कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने गडचिरोली येथील ‘परिश्रम निवास’ आरमोरी रोड, रामकृष्ण हार्डवेअर जवळ दिनांक २५/०६/२०२३ रोज सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० पर्यंत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे राज्य प्रधान सचिव श्री गजेंद्र सुरकार, मा दर्शन निकाळजे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, मा सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी, श्री विलास निंबोरकर राज्य सहकार्यवाह वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प, मा पि एम जाधव कार्याध्यक्ष जिल्हा शाखा चंद्रपूर, मा रोहिदास राऊत जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, मा पंडित पुडके सचिव अ भा गुरुदेव सेवा मंडळ, मा शेषराव येलेकर राज्य उपाध्यक्ष ओबीसी महासंघ आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रात केले आहे पहिले सत्र सकाळी ११.०० ते २.०० पर्यंत राहणार असून यात महा अंनिस च्या तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून विविध विभागांतर्गत असलेल्या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मध्यान्ह भोजनानंतर दुसरे सत्र दुपारी २.४५ ते ४.०० या कालावधीत महा अंनिस च्या विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिव व विविध विभागांचे कार्यवाह यांनी या एक दिवसीय कार्यशाळेत उपस्थित राहावे असे आवाहन महा अंनिस चे जिल्हा अध्यक्ष श्री रोहिदास राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे व प्रा विलास पारखी यांनी केले आहे.