” छत्रपती शाहू महाराज “

43

छत्रपती शाहू । राजाच्या रुपात।
जन्मले ग्रामात। कागलात॥१॥

शाहुंचे संस्थान। एक कोल्हापूर
कार्य सर्वदूर । भारतात॥२॥

पेटवून दिली। प्रकाशाची वात।
तिमिराची रात। संपविली॥३॥

बोले तैसा चाले। कर्ते सुधारक।
प्रजेचे नायक। कर्मांनीच॥४॥

छत्रपती शाहू। सर्वांना शिक्षण ।
बोर्डिंग स्थापन। संस्थानात॥५॥

आरक्षण दाते । पहिलेच राजे।
बहुजन राजे। कोल्हापुरी॥६॥

कोल्हापूर क्षेत्री । मुक्त केले जन ।
अस्पृश्यतेतून । शाहू राजे ॥ ७ ॥

शाहुंच्या कार्याला । करितो नमन।
करांनी वंदन। कोटी कोटी॥ ८॥

✒️अभंगकार:-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,अमरावती(महाराष्ट्र)भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९