सातारारोड पाडळी येथे आरक्षणाचे जनक बहुजन उद्धारक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!

77

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.26जून):- तक्षशिला नवतरुण मंडळ,माता रमाई महिला मंडळ,माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 149 वी शाहू जयंती तक्षशिला बुद्ध विहार सातारारोड पाडळी येथे मोठ्या संख्येने उत्साहात साजरी करण्यात आली..! यावेळी सकाळी 9:30 वाजता विहारात सामुहिक बुद्धवंदना घेऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या फोटोला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..!

यावेळी माता रमाई महिला मंडळांच्या अध्यक्षा मा.स्वाती आवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्य आणि संघर्ष याच्या विषयी माहिती समाजासमोर मांडली व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन छत्रपती शाहू महाराजांचे विचार समाजात पेरण्यासाठी महिलांनी चळवळीत उतरून काम केले पाहिजे तेव्हाच समाजात परिवर्तन होईल आणि महापुरुषांना जयंती दिनी खरखुरे अभिवादन ठरेल..!

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.नालंदा आवडे अध्यक्षा माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह सातारारोड पाडळी यांनी केले व कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्ते तक्षशिला नवतरुण मंडळाचे अध्यक्ष मा.श्रीकांत आवडे, महेश आवडे, प्रमोद काळे, संदीप आवडे, ऋषिकेश बनसोडे,महिला मंडळ, विद्यार्थी इ.कार्यकर्ते उपस्थित होते