संविधान वाचविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढावी लागेल-एस के भंडारे

44

✒️कल्याण(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कल्याण(दि.2जुलै):- संविधानाचे विरोधक धर्मावर आधारित संविधान आणण्यासाठी सर्वांना समानता देणारे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत त्यामुळे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य व स्वाभिमान जाऊन पुन्हा अस्पृश्यता लादण्याचा कारस्थान चालू आहे.

त्यासाठी संविधान मानणाऱ्यांच निवडून द्या आणि प्रसंगी संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर यावे लागले तर त्यासाठी तयारी ठेवा व कार्यकर्त्यांनी प्रबोधन करताना सामाजिक आणि धार्मिक भान ठेऊन बोलावे असे ठाणे जिल्हास्तरीय चिंतन शिबिर,वर्षावास प्रवचन मालिका व बौद्धाचार्य शिबिराचे उदघाटन करताना एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ) यांनी प्रतिपादन केले. बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ) यांनी प्रबोधनाची आचारसंहिता याविषयावर मार्गदर्शन करताना असे सांगितले की , महामानवांचा विचार सांगताना कोणतीही भेसळ करुनये व कोणत्याही धर्मावर टीका टिपणी करू नये.

अँड प्रकाश मौर्य ( राष्ट्रीय संघटक ) यांनी महामानावांचा वारसा या विषयावर मार्गदर्शन केले. भिकाजी कांबळे ( अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती कशी गतिमान करावी अर्थात बीएसआय मिशन या विषयावर मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी प्रत्येक शाखेने 8 गोल्डन मार्गाचा अवलंबून करून गावागावात घरो घरी जाऊन बौद्ध सभासद अभियान राबवावे असे सांगितले .अँड एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) यांनी हिशोब कसा ठेवावा व संस्थेचे कार्य कसे करावे हे उदाहरणासह सखोल समजून सांगितले. शेवटी एस के भंडारे यांनी शंका आणि प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.या कार्यक्रमासाठी डी एम आचार्य (समता सैनिक दल हेडक्वार्टर सचिव ) , शामराव कांबळे ( संस्कार सचिव ,महाराष्ट्र राज्य ) उपस्थित होते . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 1लाख बौद्ध सभासद करण्याचा ठराव करण्यात आला.

पहिल्याच जिल्हा चिंतन शिबिरात 35 बौद्ध आजीवन सभासद झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय गायकवाड ( ठाणे जिल्हा अध्यक्ष ) होते , सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रशांत गांगुर्डे ( ठाणे जिल्हा संस्कार सचिव ) यांनी केले. चिंतन शिबिरात केंद्रीय शिक्षक ,शिक्षिका ,बौद्धाचार्य, जिल्हा व तालुका कार्यकारणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.