नागभीड येथे जन आक्रोश मोर्चा हजारोच्या संखेंत महीला व पुरुष सहभागी

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.3जुलै):-पुरोगामी महाराष्ट्रात अल्पसंख्यांक, अनु. जाती/ जमाती यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे.नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे अक्षय भालेराव या तरुणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. तर दुसरी घटना दक्षिण मुंबईमधील चरणी रोड भागात असलेल्या सावित्रीबाई फुले वस्तीगृहात हिना मेश्राम या विद्यार्थिनीचा बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनेचा निषेध करण्याठी बौद्ध समाज नागभीड तालुक्याच्या वतीने आज दिनांक ३/७/२०२३ रोज सोमवारला ठीक ११ वाजता आनंद बुद्ध विहार नागभीड येथुन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागभीड तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संखेने सामील झाले होते.

मोर्चा मध्ये अक्षय भालेराव अमर रहे, अक्षय भालेराव यांच्या मारेकर्यांना फाशी द्या अशा घोषनांनी नागभीड शहर दनानुन गेले. मोर्चा अतीशय शीस्तपने जात होता. समता सैनिक दल लोनखैरी यांनी मोलाची कामगीरी केली.मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहचताच मोर्चाचे रुंपातर सभे मध्ये झाले. यावेळी मोर्चाला संबोधन करण्यात आले. प्रा.डाँ. अनमोल शेंडे, शाम रामटेके ,अँड. आनंद घुटके , अँड.शर्मीला रामटेके , डाँ. मनोहर टेंभुरकर, मनोहर रामटेके, आश्विन मेश्राम , अमृत शेंडे ,चंदन कोसे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. जातीवादी समाज कंटकांना धडा शिकविन्यासाठी व अक्षय भालेराव यांच्या परीवाराला न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व बौद्ध बांधव मोठ्या संखेत या मोर्चात सामील झाले होते.