डॉक्टर्स डे निमित्त सत्यशोधक समाज संघातर्फे शहरातील डॉक्टरांचे सत्कार

38

🔸औषधांसह ‘ आत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे : शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी

✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जळगांव(दि.3जुलै):- औषधांसह ‘ आत्मियता ‘ हे डॉक्टरांचे व्यवसाय सूत्र असावे असे भावनिक आवाहन शिक्षणतज्ज्ञ तथा प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले. राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संभाजी नगर जळगाव येथील संभाजी नगर मधील प्रेरणा क्लिनिक मध्ये दि.१ जुलै २०२३ रोजी डॉक्टरांच्या सत्कार समारंभा प्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत भंडारी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.डी.सी.सी बँकेचे निवृत्त अधिकारी जी.एम.पाटील होते. मार्गदर्शनात भंडारी पुढे म्हणाले की,’ मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि स्पेशल डॉक्टर यामुळे सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांचा धावपळ व पैशांच्या जमवाजमवीत प्रसंगी जीव गमावला जातो म्हणून ‘ फॅमिली डॉक्टर्स ‘ ही संकल्पना नव्याने वैद्यकिय क्षेत्रात रुजविणे काळाची गरज आहे.

तत्पूर्वी सत्यशोधक समाजाची ध्येय धोरणे कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी सांगून सत्काराचे प्रयोजन व आजतागायत तीन वर्षापासून डॉक्टरांचा केलेल्या सत्काराचा तपशील विनम्रपूर्वक संक्षेपाने सांगितला.वेळप्रसंगी भूक तहान तसेच स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करून रुग्णाचा जीव वाचणारे डॉक्टर्स पृथ्वीवरील प्रति परमेश्वर आहेत.समाजाने कृतज्ञतापूर्वक डॉक्टरांचा सन्मान करणे हीच खरी ईश्वर पूजा आहे अशी कृतज्ञता लुल्हे यांनी व्यक्त केली.डॉक्टरांनी यथोचित औषधोपचाराबरोबर रुग्णांचे नकळत मानसोपचार सुद्धा केले तर समाजाचे भावनिक आरोग्य सक्षम होऊन आत्महत्या, लैंगिक अत्याचार ,भ्रष्टाचार व अंधश्रद्धा निश्चित कमी होतील असे भावनिक आवाहन लुल्हे यांनी केले.

राष्ट्रीय ‘ डॉक्टर्स डे ‘ निमित्त सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे जळगाव शहरातील विविध विभागातील मान्यवर डॉक्टरांचा शाल , श्रीफळ देऊन हृद्य सत्कार शनिवार दि.१ जुलै २०२३ रोजी संबधित हॉस्पिटल मध्ये जाऊन सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सत्कार समारंभाच्या अभियानाचा शुभारंभ चैतन्य नगरातील ज्येष्ठ नागरीक संघाच्या प्रांगणात सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ तथा जीवन विकास केंद्राचे अध्यक्ष डॉ.विकास निकम यांचा सत्कार सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.
अन्य सत्कारार्थी डॉक्टरांच्या सत्काराचा तपशील पुढील प्रमाणे :-
* डॉ.विजया तळेले – हस्ते भारती पाटील ( ज्येष्ठ नागरीक संघाच्या महिला अध्यक्ष )
* डॉ.संजय चौधरी – हस्ते
ॲड.अरुण धांडे ( अध्यक्ष,
ज्येष्ठ नागरिक संघ )
* डॉ.राहुल पाटील – हस्ते
पी.आर.सोनार ( माजी
अध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक संघ )
* डॉ.दिपक पाटील ( नेत्रतज्ज्ञ ) – हस्ते सत्यशोधक विजय लुल्हे
* डॉ.सौ.पंकजा पाटील ( भुलतज्ज्ञ ) – सौ.भारती पाटील
* डॉ.उत्तम पाटील – हस्ते पी.आर.सोनार
***********************
अध्यक्षीय भाषणात जे.डी.सी.सी.बँकेचे निवृत्त मॅनेजर ( बिनशेती कर्ज विभाग ) जी.एम.पाटील म्हणाले की,’ सत्यशोधक समाजाने डॉक्टरांच्या सेवा कार्याचा सन्मान करून डॉक्टर हे सामाजिक व नैतिक आरोग्याचे ईश्वरदूत आहेत हे सिद्ध करणारा हा प्रेरणादायी उपक्रम आहे.’ धनाढ्यांना पैशांचे आजार,मध्यमवर्गियांचे चिंतारोग व गरीबांना श्रद्धेचे आजार असतात याचे विनोदी व मिश्कील किस्से सांगून पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाने प्रेरीत झाल्याने ज्येष्ठ नागरीक संघाचे माजी अध्यक्ष पी.आर सोनार यांनी डॉ.उत्तम पाटील यांचा वैयक्तीक खर्चाने सत्कार केला.याप्रसंगी आर्टिस्ट प्रकाश सुर्यवंशी, गणेश सपकाळे, पियुष चव्हाण उपस्थित होते. आभार प्रदर्शन कार्यवाहक विजय लुल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या भगिनी शशिकला बोरोले, निवृत्त प्राध्यापिका शालिनी सोनवणे,शालिनी किरंगे तसेच सचिव विकास बोरोले, सदस्य प्रकाश यावलकर यांनी अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य केले.