उमरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत खुलेआम सुरू असलेला मटका व जुगार त्वरित बंद करा- भीम टायगर सेना

41

✒️महागाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

महागाव (दि. 10 जुलै):-उमरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत तालुक्यात खुलेआम सुरू असलेला मटका व जुगार त्वरित बंद करा अशी मागणी भिम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शाम धुळे यांनी केली आहे.

कारण यामुळे शहरात व तालुक्यात अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे, व त्यांचे संसार उघड्यावर पडत आहे, घराघरांमध्ये रोज भांडण सुरू आहे, मटका व जुगार साठी तरुण पिढी वाईट मार्गी लागली आहे. तसेच अनेक जन आपल्या घरातील वस्तू विक्री करून मटका व जुगार खेळण्यास जात आहेत.

विशेष म्हणजे उमरखेड शहरात व तालुक्यात यामुळेच चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे अनेक वाईट प्रसंग घडताना आपल्याला पाहावयास मिळत आहे.

तरी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी वरील विषयाचे गांभीर्य ओळखून खुलेआम सुरू असलेला मटका व जुगार येत्या 8 दिवसाच्या आत बंद करण्यात यावा ही नम्र विनंती. असे निवेदन उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये दिले आहे.

अन्यथा भिम टायगर सेना सामाजिक क्रांतिकारी संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरखेड येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भिम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शाम धुळे यांनी दिला आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष कैलास कदम तालुका, उपाध्यक्ष संदीप विनकरे, उमरखेड शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर व अनेक उमरखेड शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.