उमरखेड तालुक्यातील पोफाळीचा मोहरम सामाजिक ऐक्याचे प्रतिक

39

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 29 जुलै):-तब्बल शंभरवर्षापासुन पोफाळी ता.ऊमरखेड येथील मोहरम (ताजिया) उत्सव हिंन्दु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक ठरला आहे.या उत्सवाला दरवर्षी पंचकोशीतील भाविक दर्शनसाठी येत असतात. मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही.प्रत्येक धर्मानेच मानव कल्याण सांगितले आहे.केवळ अनुयायी धर्माचे सोयीचे अर्थ काढुन वागतात.त्यामुळे सामाजिक विषमता वाढीस लागते.मात्र आला अपवाद ठरला तो पोफाळीतील मोहरम आजही समाजात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र सलोख्याने राहत असल्याचे चित्र पोफाळी सारख्या गावात बघायला मिळते.

गावातील दहा दिवसाचे मोहरम ताजीया उत्सव सामाजिक एकतेचे प्रतिक आहे.हजारो हिन्दु-मुस्लीम भावीक मोहरम उत्सवात सामील होतात.या उत्सवात “सवारी आणि डोला” व घोड्यावर यांची प्रतिकृती बनवुन नाचविण्याची परंपरा आहे.यासह अनेक भाविक विविध वेशभुषा करून उत्सावत डपडी च्यातालावर नाचताना तल्लीन होताना दिसतात.हजारोच्या संख्येने आलेले भाविक आपला नवस पुर्ण करून घेतात.पुजाअर्चना करून शंभर वर्षा पासुन ही पंरपरा जोपासली जाते.

सर्व स्तरातील बांधव एकत्र येऊन सांयकाळी गावातुन सवारी डोला प्रतिकृती एकत्र आणुन भेटीगाठी घैतात.त्यानंतर उत्सवाची सांगता केली जाते.या उत्सवादरम्यान अनुचित प्रकारघडु नये यादृष्टीने पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला.