पोखर्णी वाळके येथे लोकशाहीर साहित्यरत्न साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्य शैक्षणिक साहित्य वाटप

244

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8ऑगस्ट):- तालुक्याकतील पोखर्णी वाळके येथे लोकशाहीर साहित्यरत्न साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्य जी.प. प्रा. शा.पोखर्णी वाळके येथे जयंती निमित्य वही व पेन चे वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुट्टे सर होते

प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य लिंबाजी देवकते, सरपंच दत्तराव वाळके, राजेश सगट, संजय धापसे, ग्रामपंचायत सदस्य मोकिंद पंडित, वैजनाथ आडे, बबन देवकते, दशरथ जोगदंड, रामकिशन कदम, प्रभाकर पंडित, बाबुराव परकड, प्रमोद जाधव, संतोष परकड, संभाजी पंडित, विलास सानप सर, चंद्रशेखर मुंडे सर हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीपार पाडण्यासाठी दिगंबर कलिंदर, सखाराम परकड, बंडू वाळके, भरत पंडित, हनुमान सगट यांनी परिश्रम घेतले.तर या कार्यक्रमा्चे सूत्रसंचालन माधव मुंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश सगट यांनी मानले.