पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्लेचा केला जाहीर निषेध

144

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12ऑगस्ट):- येतील पत्रकार बांधवाच्या वतीने पत्रकार संदीप महाजन व सांपादक चंद्रमुनी घोडके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लेचा जाहीर निषेध करण्यात आला या असयाचे निवेदन गंगाखेड तहसीलदार यांना पत्रकार बांधवाच्या वतीने देण्यात आले आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार व सांपादक यांच्यावर मोठया प्रमाणावर हल्ला होण्याच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे.

पाचोरा येथील गावगुंडानी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला असता, परभणी जिल्हातील पाथरी तालुक्यातील मुदगल येथील पब्लिक न्यूज चे सांपादक चंद्रमुनी घोडके यांच्यावर हि जातीय द्वेशातुन गावागुंडाकून तलवारीने व कोयत्याने हल्ला करण्यात आला.या मुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आला असून,लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारावर जीवघेणा हल्ला होत केला असताना देखील गुन्हेगारावर गुन्हा दाखल होत नाही.

या मुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी याची दखल घेऊन गुन्हेगारावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी आदेशीत करावे अन्यथा सर्व पत्रकार यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आशे निवेदन तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर पत्रकार गुणवंत कांबळे, पत्रकार राजेश कांबळे, पत्रकार महालिंग भिसे, पत्रकार अली चाऊस, पत्रकार भागवत जलाले, पत्रकार मोहसीन खान, पत्रकार भीमराव कांबळे, पत्रकार बाळासाहेब जंगले, पत्रकार अनिल साळवे, पत्रकार पिराजी कांबळे, पत्रकार शिवाजी कांबळे, पत्रकारदेवानंद गुंडाळे, पत्रकार शेख महेमुद, पत्रकार राहुल साबाने यांच्या स्वाक्षरी देण्यात आले आहे.