राजकीय आश्रयातून अधिका-यांची मनमानी-जलजीवन योजनेच्या कामात गैरप्रकार

146

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 1 सप्टेंबर):-जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून उमरखेड तालुक्यात जलजीवन योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. या योजनेवर शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी खर्चविण्यात येत आहे.

परंतु शासकीय नियम व निकष पायदळी तुडवून उमरखेड उपविभागाचा अभियंता कंत्राटदाराशी आपली भागीदारी ठेवून दर्जाहीन व निकृष्ट पद्धतीने जलजीवन योजनेची कामे करीत असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यावरुन जिल्हा परिषदेच्या अभियंताला राजकीय आश्रय असल्याची चर्चा जोर धरत आहे.

शासनाकडून ग्रामीण जनतेला मुबलक व स्वच्छ पाणी मिळण्यासाठी जलजिवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयाचा कारभार हा एक हाती म्हणजेच एकाच अभियंत्याकडे उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता असा दुहेरी पदभार आहे.या कार्यालया अंतर्गत संपूर्ण उमरखेड तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनेच्या कामाची निगराणी केवळ एकाच व्यक्तीकडे आहे.

येथील अभियंत्याच्या पाठीशी राजकीय आश्रय असल्यामुळेच येथे कार्यरत अभियंत्याची मनमानी चालत असल्याचा आरोप होत आहे.वरिष्ठ कार्यालयाकडे नागरिकाकडून करण्यात आलेल्या तक्रारी ही बेधखल होत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर नागरिकांतून संताप व्यक्त केल्या जात असल्याचे दिसत आहे.