राष्ट्रीय मानवधिकार महाराष्ट्र सचिव पदी सुरज यादव

68

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.1सप्टेंबर):- रुग्णसेवा रक्तसेवा तसेच आर्थिक सेवेमध्ये 2013 पासून अविरत सेवा कार्य करून 17,000 हजाराच्या वर रुग्णांना रक्तदाते उपलब्ध करून जिवनदान देणारे दिव्यांग गरजू गरीब रुग्णाच्या पाठीशी खंबीरपने अर्ध्यारात्री एक मसीहा म्हणुन कार्य करणारे एकनिष्ठा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरज यादव यांनी कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता 60 दिवस दोन वेळेस जेवणाची सोय रुग्ण वाहिका सुविधा एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत करून गरजू रुग्णाला निशु:ल्क सेवा दिली ऑल इंडिया मध्ये मित्रांच्या मदतीने रक्तदाते अवलेबल करून सेवा दिली.

या सेवा कार्याची दखल राष्ट्रीय मानवधिकार एवं सामाजिक न्याय आयोग दिल्ली ऑल इंडिया प्रेसिडेंट डॉक्टर म्हताब रॉय व हैद्राबाद स्टेट प्रेसिडेंट बर्रपती सर्वेनदर यांनी घेत सुरज शिवमुरत यादव राहणार खामगांव जिल्हा बुलढाणा यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवधिकार एवं सामाजिक न्याय आयोग महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड केली.