सर्वोदय एज्युकेशन सोसायटीतर्फे आजी व माजी शिक्षकांचा सत्कार !…

57

🔹एक चांगली शाळा म्हणजेच देशाचं भविष्य होय – आयुष प्रसाद [ जिल्हाधिकारी ]

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

असोदा(दि.5सप्टेंबर):- आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असण्याबरोबर देशाचे भविष्य असते आणि चांगला देश घडविण्यासाठी चांगल्या शाळा असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून नुसतं शाळेचे बाह्यांग सर्वांग सुंदर राहून चालत नाही तर त्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न हे देशाच्या भवितव्याला घडविणारे असतात आणि हे घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांप्रती भारतीय समाज कायम कृतज्ञ असल्याचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी तर्फे आजी-माजी शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त आयोजित सत्काराप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा आनंद घेऊन त्या शिक्षणातून आपली प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील राहताना आपल्या शिक्षकांच्या प्रति कायमच कृतज्ञता बाळगल्यास आपले जीवन समृद्ध आणि सुखी राहील असेही त्यांनी याप्रसंगी मांडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी हे होते

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार रोहित दादा पवार माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन परदेशी उपशिक्षणाधिकारी एजाज शेख गटशिक्षणाधिकारी खलील शेख केंद्रप्रमुख घनश्याम शिरसाट संस्थेचे चेअरमन उद्धवराव पाटील, संचालक दुर्गादास भोळे, गोपाळ भोळे, किशोर चौधरी, किशोर कोल्हे, पंडित चौधरी, दिलीप महाजन, सुनील चौधरी, वसंत चिरमाडे व मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी आमदार रोहित दादा पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित करताना शिक्षण ही आपली प्रगतीची वाट असून या प्रगतीच्या वाटेवर आपल्या जीवनामध्ये आई-वडिलांचे ऋण ,देशाचे ऋण आत्यंतिक जगत मान्य असून विद्यार्थी जीवनात शिक्षकांशी असणारा आपला संवाद त्यांच्या मार्गदर्शनातून होत जाणारी जीवनाची सुकरता ही आपल्याला आनंददायी असण्याबरोबर समाजाला व्यवस्थेला भक्कम करणारी असते यासाठीच आपण ज्ञानासोबत मैत्रीभाव जोपासत शिक्षकांच्याप्रति कृतज्ञता या गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या मानल्या तर अनेकदा येणाऱ्या अडचणींवर आपल्याला मात करता येते.

आपले आदर्श कोणते असावेत हे आपण ठरविणे काळाची गरज असून देशभरातल्या शिक्षकांसाठी हा कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे, शिक्षकांनी आपल्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचे स्मरण करण्याचा आठवण करण्याचा आणि एकूणच शिक्षकांच्या जीवन विषयक दृष्टिकोनाचा आपल्या जीवनात किती महत्त्वाचा वाटा आहे हा देखील भाग आपण जाणून घेण्याचा हा दिवस असल्याचे व्यक्त करत असताना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे दाखले देखील त्यांनी याप्रसंगी दिले. वर्गप्रतिनिधींच्या हस्ते मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वोदय एज्युकेशन सोसायटीतर्फे आजी व माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या देशाला विद्वान परिश्रम करणाऱ्या नागरिकाची गरज आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली पाहिजे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे सदस्य किशोरदादा चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना चौधरी,अतिथी परीचय के.बी.तायडे तर आभार एस.डी.कचरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एल.जे.पाटील,डी.जी. महाजन, मंगला नारखेडे, शुभांगीनी महाजन, वृषाली चौधरी, मीनाक्षी कोल्हे, चारुलता टोके सर्व शिक्षक, अनिल सावदेकर, अनिल नाथ, अरविंद महाजन, विलास जोशी, नितीन नारखेडे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.