गंगाखेड नगर परीषद येथील कंञाटी सफाई कामगाराना किमान वेतन देण्याची मागणी

153

🔹रोहिदास लांडगे यांनी दिला उपोषणा इशारा

✒️अनिल साळवे(गंगाखेड गंगाखेड)

गंगाखेड(दि.6सप्टेंबर):-नगर परीषद येथील कंत्राटी सफाई कामगारांना किमाण वेतन कायदया नुसार वेतन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहिदास लांडगे यांनी केली आहे.

नगर परीषद प्रशासक उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नगर परीषद अंर्तगत खाजगी एजन्सी मार्फत कंत्राटी सफाई कामगारा कडुन गंगाखेड शहरात अस्वच्छतेची कामे करून घेतले जात आहे हे कंत्राटी सफाई कामगार सकाळी ६ वाजल्या पासुन ते दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत यात कोणतीही सुविधा नसताना काम करत असतात यात त्यांना एजंन्सी मार्फत पगार अत्यंत कमी दिला जातो हा पगार देखील ३ ते ४ महीण्याने एखादाच पगार दिला जातो बाकीचा पगार तसेच ठेउन त्यंच्याकडुन जनावरा पेक्षाही जास्तीचे काम करून घेतल्या जात आहे.

यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि कुटुंबावर याचा वाईट परीणाम दिसुन येत आहे . एजंन्सीने काही कंत्राटी सफाई कामगार बाहेरून आणुन त्यात काही १८ वर्षा पेक्षा कमी वयाचे बाल कामगार असल्याचे दिसुन येत आहे त्यांच्या कडुन अस्वच्छतेची कामे करून घेऊन त्यांना रोजगार जास्त दिला जातो आणी स्थानीक कंत्राटी कामगारांना रोजगार कमी देउन यांची पिळवनुक करत असल्याचे दिसून येत आहे . खाजगी एजंन्सी मार्फत शासनाची व कंत्राटी सफाई कामगार यांची लुट होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत नियुक्त केलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदया नुसार वेतन देण्यात यावे अन्यथा बेमुदत उपोषन करण्याचा इशारा रोहिदास लांडगे यांनी दिला आहे.