मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुळी गावात साखळी उपोषणाला सुरुवात

121

🔹उपोषणाचा आज दुसरा दिवस

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8सप्टेंबर):-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात महाराष्ट्रात गावागावात मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम ठेवण्याच्या पावित्र्यात मनोज जरांगे पाटील असून यांना समर्थन देण्यासाठी गंगाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावागावात सरकारचा निषेध व्यक्त करीत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

धारासुर ,ईसाद,मुळी या गावात राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत अंत्ययात्रा काढण्यात आली दिनांक सात सप्टेंबर पासून मूळी या गावात साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे मराठा समाज जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी जानकीराम पवार ,कृष्णा भोसले , रमेश पवार,गजानन भोसले, अंकुश नवले, गणेश इंगळे, शिवाजी मुळे धनराज भोसले ,बालाजी भोसले, अंबादास भोसले, देविदास पवार, सय्यद कुरब ,नागेश भोसले रोहिदास नवले, दिगंबर पाटणकर हे उपस्थित होते.