धरणगाव तालुका शासकीय खो खो स्पर्धा चावलखेडा येथे संपन्न !…

300

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.8सप्टेंबर):- जिल्हा क्रीडा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव व पंचायत समिती धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका शालेय खो खो खेळाच्या स्पर्धां
दिनांक ४ व ६ सप्टेंबर २०२३ रोजी चावलखेडा येथे १४,१७,१९ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या खो खो खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय श्री.गुरुदत्त चव्हाण साहेब उपस्थित होते. नि ह चावलखेडा हायस्कूल चे सचिव आबासाहेब श्री.चिंतामन पाटील शाळेचे मुख्याध्यापक श्री के एस पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धां चे उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविक क्रीडा समन्वयक श्री सचिन सूर्यवंशी सर यांनी केले स्पर्धांच्या नियमांची माहिती विशाल पाटील यांनी दिली पहिल्या दिवशी मुलींच्या सर्व स्पर्धा पार पडल्या यात १४ व १७ वर्ष वयोगटात धरणगाव येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचे दोन्ही संघ विजयी झाले तर १९ वर्ष वयोगटात इंदिरा गांधी विद्यालय विजयी राहिला ६ ता. सर्व मुलांच्या गटाच्या स्पर्धा संपन्न झाल्या यात चांदसर शासकीय आश्रम शाळेचे १४ व १७ वयोगटात दोन्ही संघ विजयी झाले तर १९ वर्षं वयोगटात ए सी एस काॅलेज धरणगाव चा संघ विजयी राहिला स्पर्धांच्या समारोपाला जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव येथील खो खो खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री मिनल थोरात साहेब ,डाॅ.उल्लास पाटील महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर जितेंद्र पा.उपस्थित होते पंच म्हणून श्री डी एन पाटील एम डी परदेशी व्हि यु पाटील के एस पाटील मनोरे सर रोहित सपकाळे गोपाल पाटील विशाल पाटील यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून व्हि आर पाटील गुलाब पाटील आर बी महाले भुषण रायगडे श्री आहेराव सर वाय ए पाटील ए एम जयकारे सर पावरा सर यांनी काम पाहिले.

सुत्रसंचलन श्री व्हि यु पाटील यांनी केले व्हि बी पवार यांनी आभार मानले स्पर्धा पार पडण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले स्पर्धा तालुका समन्वयक श्री सचिन सूर्यवंशी सर व चावलखेडा हायस्कूल चे क्रीडा शिक्षक व्ही यु पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.