सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांच्याकडून भावार्थ वाचनालयास ग्रंथदान

70

🔸ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्या प्रयत्नाने भावार्थ मोफत वाचनालयाला प्राप्त झाली

🔹ग्रंथदानान्वये १५००० रूपयांची ग्रंथसंपदा !…

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.8सप्टेंबर):-सुप्रसिद्ध बाल साहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांनी टी.डब्ल्यू.जे.सोशल रिफॉर्म ,चिपळूण या संस्थेच्या भावार्थ मोफत वाचनालयासाठी स्वलिखित १७ पुस्तकांचे तीन सेट अर्थात ५० पुस्तके एकूण साडेतीन हजार रुपयांची ग्रंथसंपदा गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी संस्थेचे प्रतिनिधी वैभव काटदरे सप्रेम भेट सुपूर्द केली. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी भावार्थ पुस्तक व्हॅन यांचे प्रमुख वैभव काटदरे व भालचंद्र पवार यांची धुप्पड मॅडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घडवून आणली.अनपेक्षित पुस्तकांचा खजाना असलेली भावार्थची व्हॅन चक्क दारासमोर आल्याने मॅडम परमानंदाने भारावून गेल्या !

साहित्यिका माया धुप्पड यांच्या ‘ सावल्यांचं गाव ‘ या बालकविता संग्रहाचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अभ्यासक्रमात एम.ए.च्या दुसऱ्या भागासाठी समावेश झाल्याच्या सन्मानार्थ टी.डब्ल्यू .जे.सोशल रिफॉर्म तर्फे जळगाव शाखा व्यवस्थापक मिलिंद पाटील व जनसंपर्क अधिकारी विशाल अलकरी तसेच भावार्थ पुस्तक व्हॅनचे व्यवस्थापक वैभव काटदरे व भालचंद्र पवार यांच्यातर्फे सामुहिकपणे पुष्पगुच्छ देऊन धुप्पड मॅडम यांचा सादर हृद्य सत्कार करण्यात आला.

सत्कारा प्रसंगी ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांनी सौ.माया दिलीप धुप्पड यांच्या साहित्य लेखनाचा परिचय करुन दिला.विनंतीला मान देऊन भावार्थ मोफत वाचनालयसाठी स्वलिखित पुरस्कृत दर्जेदार पुस्तकांची भरघोस ग्रंथ भेट दिल्याबद्दल व्यक्तीशः कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त केले आणि शुभाशिर्वाद घेतले.

***********************

*बालसाहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांच्या अजोड वाङमयीन लेखनाचा कार्यालेख*

*प्राप्त पुरस्कार* :- * महाराष्ट्र शासनाचा बालकवी राज्यस्तरीय पुरस्कार *

*म.सा.प.शाखा राजगुरुनगर चा नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा राज्यस्तरीय पुरस्कार*

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांचा साहित्यासाठी विशेष उपलब्धी पुरस्कार
अन्य पुरस्कार :- बाल वाङ्मयासाठी महादेवी वर्मा पुरस्कार *

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांचा साहित्यासाठी विशेष उपलब्धी पुरस्कार *

महाराष्ट्र शासनाचा ‘ थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार यांसह १४ राज्य पुरस्कारा व्यतिरिक्त १३ अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित सौ.माया धुप्पड यांच्या समग्र साहित्यावर सुरू असलेले संशोधन कार्य पीएच.डी.* : – संशोधक डॉ.तुषार वडगावकर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत मार्गदर्शक प्रा.डॉ.वासुदेव वले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी प्राप्त केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सौ. शालिनी पाटील तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत चार संशोधकांचे संशोधन कार्य प्रगती पथावर आहे.

*अनुवाद* :- * ‘ महाराष्ट्राची सुकन्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ‘ मुळ लेखक – आतिश सुरेश सोसे लिखित पुस्तकाचा मारवाडी भाषेत अनुवाद * ‘ अभिनव अभंग ‘ – परमपूज्य डॉ.रा.प्र.पारनेरकर या पुस्तकाचा मारवाडी भाषेत अनुवाद * राजस्थानी बालकथांचा मराठी अनुवाद आणि मराठी काव्यात रूपांतर *ध्वनिफिती* :- * मनमोर ( जळगाव आकाशवाणीने स्वरबद्ध केलेली मराठी भावगीते * तू करुणेचा सिंधू ( दत्तगीते – गायक सुरेश वाडकर व देवकी पंडित ), संगीतकार – मंदार आपटे * ‘ गरगर घागर ‘ बालकथा काव्य गायक – ज्ञानेश्वर कासार ,सौ.माया धुप्पड व इतर *कार्यक्रमांचे सादरीकरण* :- * चला कवितेच्या गावाला * निसर्गकन्या :- बहिणाबाई चौधरी * पहिली माझी ओवी गं ! ( जात्यावरच्या ओव्या ) तसेच कविता,गाणी,गोष्टी *विशेष सन्मान* :- * बालसाहित्य संपदेचा समावेश महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशात * ‘ प्रणाम तुजला बुलंद देशा ‘ हे देशभक्तीपर गीत आकाशवाणीवरून संपूर्ण भारतात समूह गीत गायन पाठ मध्ये चार रविवारी प्रसारित * शासनाच्या बालभारती पुणे यांच्या ‘ किशोर ‘ मासिकात संपादक सल्लागार मंडळात तीन वर्षे सदस्य * सूर्योदय अठराव्या मराठी साहित्य संमेलन नाशिक अध्यक्ष सन – २०२१ व उद्घाटन – साहित्य संमेलन अकरावे जळगाव * मासिक ‘ ऋग्वेद ‘ आजरा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून ‘ एक लेखक – एक लेखन प्रकार ‘ मध्ये महाराष्ट्रातून प्रथम अंक कथा काव्य विशेषांक – २०१७

*विशेष उपक्रम :- अनमोल भेट बालकविता संग्रहांची* – डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव अंतर्गत संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांच्यासोबत स्वतःच्या १७ बालकविता संग्रहांची शाळांना शालेय ग्रंथालयासाठी मोफत सप्रेम भेट व ‘ मनमोर ‘ काव्यचित्र प्रदर्शन आणि कवितांचा कार्यक्रम एकूण ५० प्राथमिक व माध्यमिक शाळेत विनामूल्य वितरण
***********************

साहित्यिका सौ.माया धुप्पड यांनी ‘ पावसाची राणी ‘ या पुस्तकाला पाच राज्य पुरस्कार व ‘ सावल्यांचा गाव ‘ या काव्यसंग्रहाला सहा राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती दिली तसेच वाङमयीन प्रवासाची अस्मितापूर्ण गौरवांकीत वाटचाल संक्षेपाने सांगितली.साहित्य संमेलन व कार्यक्रम सादरीकरणातील अविस्मरणीय आठवणींनाही उजाळा दिला.तब्बल एक तास त्यांनी अनौपचारिक मार्गदर्शन करतांना प्रसंगोपात आपल्या कवितांचे दाखले देऊन मंत्रमुग्ध केले. धुप्पड मॅडम यांनी पुस्तकं व्हॅन मधील पुस्तकांच्या खजान्याचे अवलोकन करून वाचनानंद घेतला.जळगाव शाखा व्यवस्थापक यांनी टि. डब्ल्यू .जे.समुहाच्या कार्यशाखांच्या विविध स्तरीय कला, संगीत, क्रिडा, सामाजिक व व्यावसायिक कार्यनिर्देशीत मुखपत्र ‘ लाईफ ‘ मासिके माया धुप्पड यांना सहकारी जनसंपर्क अधिकारी विशाल अलकरी यांच्या उपस्थितीत सादर भेट देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.प्रस्तावना व सुत्र संचालन विजय लुल्हे व आभार प्रदर्शन विशाल अलकरी यांनी केले.