मांडवा येथील युवक चौदा दिवसांपासून बेपत्ता

128

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद तालुक्यातील मांडवा येथील युवक आकाश गजानन फोपसे हा दि.२८ ऑगस्ट पासुन बेपत्ता आहे.

वय २० वर्ष, रंग गोरा,उंची १६२ सि.मी.आहे.

हा युवक नातेवाईकांचे गाव गोपवाडी येथून दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी अंदाजे ११ वाजता सुमारास शेतातुन बेपत्ता झाला आहे. घरच्या व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतले असता कुठे ही त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

त्यामुळे पोलीस स्टेशन खंडाळा येथे हरविल्याबाबत तक्रार दि.१ सप्टेंबर रोजी दाखल केली आहे.सदर युवक हा कोणाला आढुळन आल्यास या ७०३०९८९९६० नंबर संपर्क करावा .