वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये ‘भव्य नेत्र चिकित्सा शिबिर’

130

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.१५सप्टेंबर):-कराडनगरीचे भाग्यविधाते व शिल्पकार स्वर्गीय आदरणीय पी. डी. पाटिल साहेब यांचा १५ वा पुण्यस्मृतीदिन रविवार, दि १७ सप्टेंबर, २०२३ रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे साजरा केला जात आहे.

त्यानिमित्ताने रविवार दि. १७ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी १० ते २ या कालावधीत वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे मोफत भव्य नेत्र चिकित्सा शिबिर’ आयोजित केले आहे. तरी या नेत्र चिकित्सा शिबिराचा विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच सैदापूर, बनवडी, पार्ले व कोपर्डे इत्यादी गावातील ग्रामस्थांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले आहे.