भव्य बैल जोडी सजावट स्पर्धा संपन्न

115

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15सप्टेंबर):-पोळा हा अनेक शेतकऱ्यांच्या राजाचा मोठा सण आहे. या राजाला सन्मानित व गौरवांनवित करण्याकरिता शिवनि वासी यांनी भव्य बैल जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात निरीक्षक म्हणून डॉ. नंदकिशोर मैंदळकर, डॉ. आदित्य तिवारी, सुनील पद्मावार हे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रवींद्र पहानपटे, गणेश भोयर पोलीस पाटील, चंद्रकांत पहानपटे, ऋषी नीब्रड, डॉ. सुधीर पटेल, आनंदराव लोणगाडगे, मधुकर पहानपटे, शंकर लोनगाडगे,बाबुराव बुरान,विकास लोनगाडगे, सुनील भोयर, देवराव पहाणपटे, वामन लोनगाडगे, विकास लोनगाडगे, दशरथ पहानपटे आदी उपस्थित होते. शिवनी येथील भव्य बैल जोडी सजावट स्पर्धेत एकूण 97 जोड्यांनी सहभाग नोंदविला अनेक जोड्या या उत्कृष्ट सजविल्या होत्या.

निरीक्षकांना निरीक्षण अहवाल सादर करताना तारेवरची कसं करावी लागली त्यात प्रथम क्रमांक गौरव सुनील भोयर यांच्या जोडीला, द्वितीय पारितोषिक वसंता भाऊराव पहानपटे यांना, तर तृतीय बक्षीस आनंदराव लोणगाडगे यांच्या जोडीला देण्यात आले व प्रोत्साहन पर बक्षीस वारलू पिंपळगाव यांच्या जोडीला देण्यात आले. बक्षीसात प्रथम झटका मशीन. द्वितीय इलेक्ट्रिक स्प्रे पंप व तृतीय बैलांच्या खांद्यावर टाकायची झूल देण्यात आले. स्पर्धेत जोड्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. पोलीस बंदोबस्त असल्यामुळे शिवनी येथील बैलजोडी स्पर्धा शांततेत पार पाडली कार्यक्रमात विठ्ठल डाखरे नितेश लोणगाडगे व गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.