शेषनगर, ब्रह्मपुरी येथे तान्हा पोळा उत्सव आनंदात साजरा

87

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.15सप्टेंबर):-दरवर्षीप्रमाणे यंदाही शेषनगर येथे तान्हा पोळा उत्सव अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. या उत्सवात छोट्या-मोठ्या बालगोपालांनी, महिलांनी, पुरुषांनी सक्रिय सहभाग घेतला. यात जवळपास 100 नंदीबैलांचा सहभाग होता.

लहान बालगोपालांसाठी शेषनगर वासियांनी उत्स्फूर्तपणे प्रत्येक बालगोपालांना भेटवस्तूच्या स्वरूपात गोड खाऊ दिला. त्यामुळे लहान बालगोपालांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला.

या पोळा उत्सवाचे संचालन श्री विनोद वदनलवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. भास्करराव लेनगुरे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रागिणी पेशटीवांर, मनीषा लेणगुरे, लक्ष्मीबाई वदनलवार, नंदिनी वदनलवार, शोभा टेंभुरणे, प्रतिभा भोयर यांनी अथक परिश्रम घेतले.