उपोषणकर्त्याना व्यावसायाकडून धमक्या ; अंदोलकाच्या जिवाला धोका..!

469

🔸पत्रकार परिषद घेऊन आंदोलकांनी दिली माहिती

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.19 सप्टेंबर):-उमरखेड शहर व पोलीस ठाणे हदीतील राजरोसपणे फोफावलेले वरळी मटका, गुटखा ,गावठी देशी दारू अवैधपणे विडूळ – चातारी या बिटमध्ये सर्वांधिकपणे अवैध रित्या व्यवसाय सुरु असल्याचे तिघां जनानी हे प्रमुख मुद्ये समोर करीत अवैध धंदे बंद होण्यासाठी पोलीस उपविभागीय कार्यालया समोर १८ सप्टेंबर पासुन उपोषण सुरु केले आहे.

या तिघां अंदोलकांना अवैध व्यावसायीक यांच्या कडुन उपोषण मंडपाजवळ येवुन खोट्या गुन्हयात पोलीसांच्या कार्यवाई गुंतविन्यात येईल.

अश्या धमक्या देत उपोषण सोडण्यास सांगीतले आणि गुटखा विक्रेत्याची बाजू घेवून मागील काळात मटका चालक काम करणार्‍यांने एक जनाने फोन करून धमक्या दिल्या त्यामुळे संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या या गावात संवैधानिक पद्धतीने अंदोलन करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

तेंव्हा आम्हच्या तिघा अंदोलकांची पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी या सुरु असलेल्या बाबतीत गंभीर दखल घेण्यांची वेळ आली आहे अशी माहिती अंदोलक यांनी उपोषण स्थळी पत्रकार परिषद घेवून या संदर्भात प्रसंगी आम्ही सुरक्षित नसल्याचे सुद्धा म्हटले आहे.

सोमवार पासुन उमरखेड पोलीस स्टेशन हदीतील शहर व ग्रामीण गावामधील अवैधधंदे पूर्णत: बंद करा…! म्हणून शेख इरफान, विजय कदम आणि बाबुराव ढगे यांनी उपोषण सुरुच असून अवैधधंदे जो पर्यत बंद होत नाही तोपर्यंत संवैधानिक मार्गाने अवलंबिलेले उपोषण सुरुच राहणार असल्याचे उपस्थीत पत्रकारांना अधिक माहिती देत सांगितले आहे.

उमरखेड शहर च नव्हे तर तालुक्यातील ईतर पोलीस स्टेशन हदीत अवैध धंदे सुरु आहेत हे वास्तव पणे समोर दिसते आहे.

अवैध धंदे मात्र उपोषण सुरु जरी असलं तरी मटका, गुरखा आणि अवैध गावठी दारु विक्री सुरु असल्यामुळे हे एक नवल वाटत आहे.