नैसर्गिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा “जोडे मारो आंदोलन” करणार- युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्र चट्टे

172

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.20सप्टेंबर):- नैसर्गिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा “जोडे मारो आंदोलन करणार असा इशारा चिमूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्र चट्टे यांनी दिला आहे.

शेतकरी नैसर्गिक संकटांत सापडला असून सध्याच्या परिस्थितीत शेजाऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सत्तेतील पक्षातील लोक केवळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोशेशन करतांना बातम्यांमधून दिसून येत आहेत,शेतकऱ्यांचे उत्पन्न दाम दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने सोयाबीन पिकावर आलेल्या रोगांचे साधे पंचनामे सुद्धा करवून घेतले नाही.

शेतकरी हा अशिक्षित घटक असून तो फक्त आपल्या अनुभवाने शेती पिकवतो, त्याला पिकावर येणाऱ्या नवीन रोगांविषयी विशेष माहिती नसते,अश्या वेळी शेतकऱ्यांच्या सेवेत असणारे शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरून रोगांविषयी माहिती देण्याचे साधे करीत नाही.शेतकऱ्यांना रोगावर वेळीच उपाय योजना माहीत झाली असती तर शेतकरी आज उघड्यावर पडला नसता, शासकीय निधीचा पैसा शेतकऱ्यांना तारू शकत नाही, कुठे लाख रुपयाचे पिकाचे नुकसान आणि कुठे दहा हजाराची मदत? असा प्रश्न उपस्थित करून नागेंद्र चट्टे यांनी शासनाचा धिक्कार केला आहे.

शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करून वेळीच मदत केली नाही, विम्याचे पैसे वेळीच मिळाले नाही तर युवक काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांना घेऊन जोडे मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक कांग्रेस चे अध्यक्ष नागेंद्र चट्टे यांनी दिला आहे, या वेळी अक्षय लांजेवार,अक्षय नागरीकर, राकेश साठोने, गणेश दहिकर, राहुल पिसे, मंगेश रंदई, प्रवीण जिवतोडे, अमित मोदी उपस्थित होते.