हिमायतनगर व मच्छीगुडा येथे पं. स. जिवतीचे माजी उपसभापती श्री. महेशभाऊ देवकते व सरपंच सौ गंगुबाई भूते यांच्या हस्ते काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन व विकासकामाचा श्रीगणेशा

130

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.20सप्टेंबर):-जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत रहपाल्ली (खुर्द) येथील हिमतयनगर व मछ्जीगुडा येथील विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला. जन सुविधा योजनेतून मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर झालेले होते. सदर विकासकामे मंजूर व्हावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली होती.

या भूमीपूजन सोहळयाप्रसंगी जेष्ठ नेते तथा जिवती तालुक्याचे भा.ज.पा. अध्यक्ष श्री.केशव गिरमाजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.गंगुबाई भूते, तालुका महामंत्री सुरेश केंद्रे,अनु जाती तालुका अध्यक्ष प्रल्हाद मदने, युवा मोर्चा तालुका अधक्ष गोविन्द टोकरे,बालाजी भूते, मुनीर सय्यद, वैजनाथ घुले, देविदास साबणेजी, बालाजी नालबले, ताजू शेख, ग्राम पंचायत सदस्य यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.