‘आटपाडीचा संविधान सप्ताह ‘ देश – विदेशात आटपाडीची मुख्य ओळख बनावा – सादिक खाटीक

114

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.20सप्टेंबर):-राजेंद्र खरात यांच्या पुढाकाराने गत आठ वर्षापासून सुरु असलेला संविधानाची महती तळागाळापर्यत पोहचविणारा “आटपाडीचा संविधान सप्ताह” देश – विदेशात आटपाडीची मुख्य ओळख बनावा . असे गौरवपूर्ण उदगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे महासचिव सादिक खाटीक यांनी काढले .

फुले शाहु आंबेडकर विचार मंच च्या वतीने गत ८ वर्षापासून दि . २० नोहेंबर ते २६ नोहेंबर या कालावधीत आटपाडी येथे संविधान सप्ताह साजरा केला जातो . या वर्षीच्या संविधान सप्ताह नियोजन बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून सादिक खाटीक बोलत होते . फुले शाहु आंबेडकर मंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली .

भारतीय पिढ्यांना देशप्रेमी, देशाभिमानी, शहाणे जागरूक आणि आदर्श नागरीक बनविण्याचा संविधान सप्ताहाचा आटपाडीचा हा देशातला पहिला ठरलेला उपक्रम यापुढच्या काळात अधिकाधिक ताकद, उंची, उच्च दर्जाने साजरा करण्याचा आपला मानस असून संविधान दिनाच्या पंचाहत्तरीत प्रचंड ताकदीचे वर्षभर उपक्रम राबविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे मंचाचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी स्पष्ट केले . अनेकांनी केलेल्या सुचनांची दखल घेत, कोणत्याच बाजूनी कमी न पडता यावर्षीचा सप्ताह मोठ्या दिमाखात व अनेक दिग्गजांच्या संविधानावरील मांडणीतून साजरा करणार असल्याचेही राजेंद्र खरात यांनी यावेळी सांगीतले .

सादिक खाटीक पुढे म्हणाले, प्रतिदिनीच्या छोट्या बचतीच्या मदरसा मदत डब्यांची संकल्पना या मंचाने अंमलात आणावी . ज्यायोगे सहजरित्या प्रतिवर्षी तीन ते चार लाख रुपये उपलब्ध होतील . सप्ताहात येणाऱ्या प्रत्येक वक्त्याला ऐकण्यासाठी राज्यातून हजारो लोक आटपाडीकडे यावेत, अशा देशभर नावलौकीक असणाऱ्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या, प्रचंड अभ्यासू आणि अमोल वाणीच्या वक्त्यांना आमंत्रीत केले जावे . संविधान लोकाभिमुख होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, परिसंवाद, व्याख्यानमाला इत्यादीं गोष्टी वर्षभर संपूर्ण तालुक्यात राबवाव्यात .

मुस्लीमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी , सर्वतोपरी सहाय्य, संरक्षणासाठी संविधानच उपयोगी येणार असल्याने मुस्लीमांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला शिरोधार्य मानत संविधानाचा अभ्यास, जागर करणे सध्याच्या काळात गरजेचे बनले आहे .

संविधान सप्ताहाचा हा उपक्रम राष्ट्रीय विचारधारा बळकट करणारा आहे . जगभर वाखाणल्या जाणाऱ्या आणि दखल घेतल्या जाणाऱ्या या सप्ताहाच्या उपक्रमाने अनेकांना नवा आयाम मिळणार आहे . देश मजबुतीच्या या महत्वपूर्ण कार्याने अनेकांना राज्यसभा, विधानपरिषदेवर बोलावून घेऊन सन्मानीत केले जाईल असे कस्तुरीच्या सुगंधाच्या महतीचे महत्वपूर्ण कार्य यातून अप्रत्यक्षरित्या साधले जात असल्याचा अभिमानपूर्वक उल्लेख करून सादिक खाटीक यांनी, संविधान दिन आणि संविधान सप्ताह प्रत्येक भारतीयाने धार्मिक सण, धार्मिक उत्सवाच्या पवित्र भावनेतून, ओसंडून वाहणाऱ्या, उत्साह – आनंद आणि संविधानाप्रती समर्पित होत साजरा केला पाहीजे . असेही सादिक खाटीक यांनी शेवटी म्हंटले आहे .
प्रारंभी स्वागत सुरेश मोटे सर यांनी तर प्रास्ताविक रणजित ऐवळे यांनी केले .

यावेळी डाॅ. रामदास नाईकनवरे, सुनिल भिंगे सर, समाधान ऐवळे, शाम ऐवळे , नवनीत लोंढे विटा, चंद्रकांत कांबळे विटा, किरण सोहनी गोमेवाडी, दुर्योधन जावीर, लक्ष्मण मोटे, विवेक सावंत, जनार्धन मोटे इत्यादींनी आपली मते मांडली .यावेळी जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सागर, नामदेव खरात,साहिल खरात, दत्तात्रय खरात, राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुका अध्यक्ष संताजी देशमुख, शशिकांत मोटे, राजेश मोटे, समाधान खरात, सुरेश कांबळे, शरद घाडगे, हणमंत खिलारे, बशीर मुजावर वेजेगाव, उपस्थित होते . शेवटी विशाल काटे यांनी आभार मानले .