भक्तांच्या प्रतीक्षेत बाप्पा? रात्री दहा वाजेपर्यंत मूर्तिकार ग्राहकाच्या प्रतीक्षेत

363

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.20सप्टेंबर):-महाराष्ट्रातील सण, उत्सव, परंपरा,जपण्यासाठी प्रत्येक उत्सवासाठी एक वेगळा वर्ग फार पूर्वीपासून काम करत आहे. त्यातील एक मूर्तिकार कुंभार समाजाकडे पाहिले, उन्हाळ्यातील माठ बेंदराची बैल बुद्धीची देवता गणपती,नवरात्रीत देवी, संक्रातीच्या सगळ्या घटस्थापनेची घट दिपवाळीला किल्ल्यावरची चित्रे, परंतु आर्थिक दृष्ट्या वर्षाचे नियोजन करणारा सण म्हणजे गणेशोत्सव.वर्षाची आर्थिक नियोजन या सणांच्या माध्यमातून केले जाते

परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कुंभार समाजावर आता उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे .प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवावेत की नाहीत या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाल्याने दर दिवसाला निर्णय बदलण्याचे काम शासनामार्फत केले जाते. त्यामुळे मुर्त्या मातीच्या बनवण्याची प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या संदर्भात अद्यापही घोळच सुरू असल्याने या मुर्त्यांचे वाढते प्रमाण व व्यावसायिकता यामुळे पारंपरिक कुंभार समाजाचे काम करणाऱ्यांची आर्थिक नियोजन बिघडून कर्ज बाजारपणाची वेळ आलेली आहे.

यासाठी अनंत चतुर्थीच्या अगोदर शासनाने जाहीर करावे की मूर्ती या कशाच्या असाव्यात pop की पर्यावरण पूरक अर्थात मातीच्या या संदर्भात एक निर्णय घेऊन तो निर्णय. कोणत्या एका जिल्ह्यापुरत्या मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्राची भूमिका लक्षात घेऊन तो निर्णय असावा कमीत कमी एक वर्षासाठी तरी पाळावा अशी मागणी आता गणेश मूर्तिकार कुंभार समाजाकडून होत असून, उरलेल्या गणेश मूर्तिकारांच्या मूर्तीसाठी शासनाने प्रत्येक मूर्ती मागे फुटाची किंमत ठाराऊन मानधन द्यावे अशी मागणी आता होत आहे.

*गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम स्तरावर स्टॉल लावण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने मूर्तीकरांना कुंभार समाजाला मोफत जागा द्यावी त्यामुळे रस्त्याच्या कडेला होणारा वाहतुकीचा प्रश्न ,गर्दीचा प्रश्न व मूर्ती रस्त्याच्या कडेला मांडून देवत्वाचा प्रश्न सर्वच निकाली लागतील*