फु.ना. ते बा.ना. या अरुंद रस्त्यामुळे किती लोकांचा बळी जाणार..!!

209

🔸प्रा. महादेव सखाराम गावंडे

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.21सप्टेंबर):-मध्ये फुलसिंग नाईक महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक महाविद्यालया पर्यत अरुंद रस्त्याचे काम कासव गतीने सुरु आसुन, हा रस्ता अगोदरच भरपूर वरदळीचा असुनआणि जो रस्ता पूर्वी जेवढा रुंद होता त्या मध्ये या वेळेस रस्ता जवळ पास दोन्ही बाजूने 20 फूट अरुंद केला आहे. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात रस्ते रुंदीकरन होत आहे परंतु पुसद येथील नेतेच मात्र त्याला अपवाद आहे.येथे या उलट आहे. रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे रस्त्याने चालणे कठीन झाले आहे.रस्त्याने ये-जा करताना हातात जीव घेऊन चालावे लागत आहे घरून गेलेला माणूस घरी परत येईल की नाही याची सुद्धा शास्वती नाही आणि या बाबी कडे ना अधिकारी लक्ष देत आहे ना पुसदला लाभलेले 3 आमदार लोकप्रतिनिधी सारे कुंभकर्णी झोपेत आहे आणि रहदारी पोलीस विभाग तर शोभेची बाब झाली आहे.

त्यामुळे नाहक नागरिकाचा बळी जात आहे याची दखल कोणीच घेत नसुन.पुसद शहरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर अपघाताचे माहेर घर झाले आहे. चारीबाजूने या चौकाला अतिक्रमाने थैमान घातले आहे, यांना येथे राजकीय राजश्रय असल्यामुळे ते अतिक्रमन धारकांचे अतिक्रम येथील नगरपालिका काढुच शकत नाही, ऐक तर रस्ता अरुंद केला आणि त्यामध्ये अतिक्रमण त्यामुळे नाहक निरापराध जनतेचा बळी घेत आहेत.

त्याचे घर उघड्यावर येते याचे सोयर सुतक ना संबंधीत विभागाला आहे ना लोक प्रतिनिधीला हे सारे आपल्या धुंदीत आहे, यांच्या बळावर कंत्राटदार बिनधास्त कासव गतीने काम करीत आहे, भर चौकात संथ गतीने काम म्हणजे ते जणू माणसं मारण्यासाठीच करीत आहेत की काय, त्याना कोणाचेच बंधन नाही तो या ठिकाणचा मालक झाला आहे आणि अधिकारी, लोकप्रतिनिधी मलिदा घेऊन शर्मिदे झाले आहे त्या मुळे नागरिकाला आपला जीव गमवावा लागत आहे, या मध्ये कोणाचे पालक गेले कोणाची आई गेली, कोणाचा मुलगा, तर कोणाची,मुलगी गेली याचा फरक या चोकटीवर नाही झाला हे राक्षसापेक्षा ही हे लोक राक्क्षस वृतीचे झाले आहे यांना ना कोणाची दया ना कोणाची मया यांना हवे फक्त आणि फक्त कोणाला कमिशन तर कोणाला मलिदा पण यांच्या हलगर्जी पणाचा कळस झाला आहे.

रस्ता बांधणी करणारी कंपनी तर स्वतःला काय समजते कोण जाणे तू उंटावर बसून गुर राखत आहे 2 वर्षा पर्येंत पूर्ण होणारे काम ऐक तर निकृष्ठ दर्जाहीन व त्या मध्ये ते काम कासव गतीने होत आहे त्या मुळे दररोज छोटे मोठे अपघात होऊन कोणाला जीव गमवावा लागते आहे तर कोणाला हात, पाय, गमावून आयुष्य भर अपंगत्व पतकारून राहावे लागत आहे तेंव्हा या कामावर कोणी लक्ष देईल का?व होणारे अपघात रोखतिल का..? हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

पुसद शहर पोलीस स्टेशण चे कर्तव्य दक्ष ठाणेदार म्हणून अल्प काळ राहून गेलेले गौतम साहेब आजही लोकांच्या लक्षात आहे आई आपल्या मुलाला म्हणाची बेटे सौ जा नहीं तो गौतम साहेब, आजायेंगे पण ते गेले आणि सारे विस्कळीत झाले , रस्ता बांदणी कामा मुळे तर अपघात मालिका सुरुच आहे, ही मालिका कधी थांबेल याची अशा सर्वांना लागली आहे.