जिवती तहसील कार्यालयावर शेतकरी ज‌णांआक्रोश मोर्चा धडकला

211

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.21सप्टेंबर):-भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले तरी जिवती तालुका मात्र विकासापासून कोसो दूर वंचित असून, जिवती तालुका हा अतिदुर्गम डोंगराळ व आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, या जिल्ह्यातून दुष्काळाच्या काळात लोक सन 1955 ला येवून या माणिकगड पहाडावर वन जमिनीवर अतिक्रमण करून जंगल तोडून शेतकरयांनी शेती करुन आपला उदरनिर्वाह चालवला आताही शेतीवरच उदरनिर्वाह करीत आहेत.

जिवती तालुक्यातील 90% शेती ही कोरडवाहू क्षेत्र असल्यामुळे निसर्गाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. या जिवती तालुक्यातील 70% टक्के शेतकरी बांधवांना आतापर्यंत शेतीचे त्यांच्या हक्काचे जमीनीचे पट्टे मिळालेले नाही आणि घराचे सुद्धा पट्टे मिळालेले नाही, म्हणून या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही, शासनाने या मोर्च्याची दखल घेऊन खालील मागण्या पूर्ण कराव्यात.

1) तीन पिढ्याची अट रद्द करून जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे द्या.
2) जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्यात यावे.
3) जिवती येथे न्यायालय सुरु करा.
4) जिवती येथे बसस्थानक तात्काळ मंजूर करा.
5) जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीची निधी तात्काळ जमा करण्यात यावे.
6) नगरपंचायत जिवती येथे मंजूर असलेले रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे.
7) जिवती तालुक्याच्या विकास कामासाठी लागणारी वनविभागाची विविध (NOC) ची अटी रद्द करा.
8) जिवती येथे भारतीय स्टेट बँक शाखा तात्काळ मंजूर करा.
9) नगरपंचायत जिवती येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर असलेले 664 घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी परवानगी तात्काळ देण्यात यावी.
10) जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारकांना घराचे पट्टे तात्काळ सर्वे करून देण्यात यावे.
11) जिवती तालुक्यातील सर्व गाव व तांड्यामध्ये सर्वे करून गावठाणा वाढवून तात्काळ देण्यात यावे.

अश्या या शेतकरी जनहिताच्या विविध मागण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने व शेतकरी संघटनेच्या सहकार्याने ऍड. माजी आमदार वामनरावजी चटप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शेतकरी जणांक्रोश मोर्चा जिवती येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आले या मोर्चाला माजी आमदार वामनराव चटप साहेब, निळकंठराव कोरांगे पाटील, सय्यद शब्बीर जागीरदार,सुधाम राठोड , सय्यद इस्माईल भाई यांनी मार्गदर्शन केले.विनोद पवार यांनी संचालन केले आणि तहसीलदार साहेब यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

या आंदोलनात सहभागी निळकंठराव कोरांगे पाटील, मधुकर चिंचोलकर,सय्यद शब्बीर जागीरदार, नरसिंग हामणे, विशाल राठोड, सय्यद इस्माईलभाई, विनोद पवार, गणेश कदम, रामेश्वर नामपल्ले, उध्दव गोतावळे, लक्ष्मण पवार, नामदेव राठोड, कर्मराज कांबळे, सुनील बावणे, मिथुन चव्हाण, अमोल चव्हाण, रवींद्र राठोड, कपिल जाधव, अंबादास चव्हाण, देवला चव्हाण, रमेश पवार, व्यंकटी जाधव, प्रकाश राठोड,बालाजी बनसोडे,रघुनाथ पोले व शेतकरी संघटना तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.