कंत्राटी पद्धती भरतीचा एकजुटीने विरोध करा – रिपब्लिकन नेते डॉ.सिद्धार्थ भालेराव

155

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23सप्टेंबर):-कुठलीही शासकीय पदाचे अधिकारी व कर्मचारी पदभरती कंत्राटी तत्वावर करण्याचा सरकारचा डाव हा आरक्षणावरचा मोठा घाला असून या पद्धतीला विरोध करण्यासाठी एकजुटीने तयार रहा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भालेराव यांनी शनिवारी तालुक्यातील सांगळेवाडी येथे केले.

शनिवारी (दि.२३) रोजी दुपारी १ वाजता तालुक्यातील सांगली येथे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या शाखा स्थापनेचा कार्यक्रम प्रदेश उपाध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन डॉ सिद्धार्थ भालेराव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चिंतामणी साळवे, लातूर जिल्हा कोषाध्यक्ष पद्माकर कांबळे, डॉ आंबेडकर सूतगिरणीचे जेष्ठ संचालक वैजनाथराव व्हावळे, रोहिदास भालेराव, विश्वानंद साळवे आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या शाखा स्थापनेचा कार्यक्रम पार पडला.

पुढे बोलताना प्रदेश उपाध्यक्ष डॉ सिद्धार्थ भालेराव म्हणाले की, सध्या आरक्षण उठवण्याचा सरकारचा कुटील डाव असून आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक घटकाने आरक्षणाच्या बचावासाठी एकसंघ होणे गरजेचे आहे. कंत्राटी पद्धतीने होऊ घातलेली पदभरती हा आरक्षण उठविण्याचाच कुटील डाव हाणून पाडण्यासाठी एकदिलाने लढाई लढण्याचे आवाहन यावेळी डॉ भालेराव यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन पक्ष पक्षाचे सांगळेवाडी शाखा अध्यक्ष जळबाजी वाघमारे, उपाध्यक्ष अशोक मलगे, सचिव शंकर तेरवर, सदस्य पांडुरंग मलगे, मारुती वाघमारे, दत्तराव तेलवर, देवबा मलगे, बालाजी वाघमारे, विश्वनाथ मलगे, दत्ता मलगे, नवनाथ मुलगे, बालाजी तेलवर, ज्ञानेश्वर मलगे, भुजंग मलगे, दत्तराव मलगे, ज्ञानोबा मलगे, धनराज गोरे, रघुनाथ वाघमारे, रामभाऊ खुळखुळे, राजेभाऊ वाघमारे, प्रकाश मलगे, संग्राम मलगे, रघुनाथ वाघमारे, बाबुराव शिंदे आदींनी परिश्रम घेतले.