गणेशपुर शिवारात वाघाने हल्ला करून वासरू केले ठार

309

🔸गणेशपुर शिवारातील घटना

🔹शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23सप्टेंबर):-तालुका अंतर्गत येत असलेल्या गणेशपुर शेत शिवारात 22 सप्टेंबरच्या रात्री गोठ्यात बांधलेल्या वासावर वाघाने हल्ला करून ठार मारले आहे.

सविस्तर वृत असे की पार्डी येथील सुभाष तुकाराम वांझाळकर.यांचे गणेशपुर शिवारात शेत आहे त्यांचे जनावरे शेतातील गोठ्यात बांधलेली होती महालक्ष्मी पुजन असल्यामुळे रात्री कुणी शेतात गेली नाही.

सकाळी सुभाष वांझाळकर हे म्हशीचे दूध काढण्याकरिता शेतात गेले असता त्यांना हे वासरू ठार केल्याचे दिसले.
वासरू कशाने मारले त्याचा शोध घेतला असता शेतात वाघाची पंजे दिसून आले.

त्यामुळे हे वासरू वाघाने ठार केल्याचे त्यांच्या निर्देशनात आले. त्यांनी तत्काळ फोन करून वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे वनपाल पी.बी. ताटे.साहेब यांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन पंचनामा केला यामध्ये सदर शेतकऱ्याचे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.याच गोठ्यामध्ये दोन म्हशी सुद्धा बांधून होत्या या म्हशीवर वाघांनी हल्ला केला नाही त्यामुळे दोन्ही म्हशी सुरक्षित आहेत.

शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे घटनास्थळावर पंचनामा करतेवेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे,सुनील राठोड, विक्की झरकर,मनोहर जाधव,किशोर गोरे,लहु वाघमारे,प्रभाकर गोरे,पिंटू वांझाळकर उपस्थित होते.