सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक व कृषी शास्त्रज्ञ यांच्या समोर मांडली व्यथा

192

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25सप्टेंबर):-तालुक्यातील बोरी (खुर्द) येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा शेतात पाहणी करत असता तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये यॅलो मोझॅक, खोड अळी, चक्रीभुंगा, बुरशी मुळकुज व वातावरणातील वायरल या विविध रोगामुळे पुसद तालुक्यातील संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे.

लागवडीसाठी लावलेला खर्चही निघणार नाही ही संपूर्ण व्यथा पाहण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे व कृषी शास्त्रज्ञ तसेच पुसद तालुका कृषी अधिकारी व्ही .टी. मुकाडे , कृषी सहाय्यक एस. पी .जाधव ,कृषिनिर्मिती फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष विश्वनाथ मुखरे व बोरी शिवारातील विविध शेतकरी हजर होते.

या उपस्थित असलेले शेतकरी जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांना सोयाबीन पिकाला विविध रोगापासून झालेल्या नुकसानीची दाहकता दाखवत होते. आज रोजी सोयाबीन उत्पादक शेतकरी एकरी 10 ते 12 हजार खर्च करून बसले आहेत,उत्पादन खर्च ही निघने अवघड आहे .तरी कृषी अधिक्षकानी शासन दरबारी जास्तीत जास्त मदत आम्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून द्यावी तसेच पिक विमा मिळावा ही विनंती शेतकऱ्यांनी केली.

यावेळी विश्वनाथ मुखरे, विनोद पुलाते, मयुर शिवणकर, अश्विन पुलाते, गजानन मुखरे, ईत्यादी शेतकरी उपस्थित होते