राज्य शासनाने काढलेल्या कंत्राटी भरतीचा जी.आर. तात्काळ रद्द करावा-कॉंग्रेस तालुक़ा अध्यक्ष गोविंद यादव

117

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील लाखो रिक्त पदे भरण्यासाठी काढलेल्या जीआरला (शासन निर्णय) राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार, युवक आणि विद्यार्थी यांचा तीव्र विरोध होत आहे. या विरोधाची दखल घेऊन शासनाने जीआर मागे घेऊन पूर्वीप्रमाणे शासकीय पदे भरावीत अशी मागणी करण्यात आली.

शासकीय कामकाज करण्यासाठी कंत्राटी कामगार भरती करण्यात निर्णय घेतला आहे. सहा सप्टेंबर रोजी काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा या मागणीचे निवेदन युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदार याना देन्यात आले.

यावेळी कॉंग्रेस तालुक़ा अध्यक्ष गोविंद यादव, अ.सेलचे जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर सालवे, मा.नगरसेवक प्रमोद मस्के, युवक जिल्हाउपाध्यक्ष नागेश डमरे, अ.सेलचे तालुक़ा अध्यक्ष सुभाष शिंदे, कामगार सेलचे तालुकाध्यक्ष शिवाजी घोबले, युवक शहर अध्यक्ष निलेश टोंम्पे ,शहरउपाध्यक्ष शैख आज्जू, सिद्धोधन भालेराव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.