खातगुण तरंग्यात झाले बाप्पा विराजमान साडेतीनशे वर्षांची परंपरा

62

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.26सप्टेंबर):- जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुन येथील पीर साहेब राजे बाग सार दर्ग्यात गेली 45 वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही गणेश सेवा मंडळाच्या वतीने do सुबक सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला

खटाव मध्ये सध्या नको त्या कारणावरून दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्न संतोष हे लोकांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे मात्र सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या खात गुण तालुका खटाव येथील दर्ग्याच्या आवारातच गेल्या 45 वर्षापासून गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायक संदेश दिला जात आहे.

खटाव तालुक्यातील खत गुन्हे हिंदू मुस्लिम समाजाचे संस्कृती व सलोखा मिळून मिसळून जोपासणारे गाव शिवाजी महाराजांच्या काळापासून सुमारे साडेतीनशे वर्षांपासून या गावात असलेल्या पीर साहेब राजेबाग सार दर्ग्यातील कबीरीचा मुस्लिम इतकाच हिंदू समाज मोठा भाविक वर्ग आहे या दर्ग्यात नगाऱ्यासह दररोज होणाऱ्या आरतीला हिंदू मुस्लिम समाज एकत्रित असतो मुस्लिम समाजाचे विविध कार्यक्रम हिंदूंचे कीर्तन भजन यासारखे कार्यक्रम या तालुक्यात होतात हिंदू मुस्लिम बांधव मिळून मिसळून साजरी करतात दोन्ही समाजातील बांधव एकत्र येऊन मोठ्या भक्ती भावाने साजरे करत हिंदू मुस्लिम एक रुपयाचा दिला जाणारा संदेश निश्चित का कौतुकास्पद आहे

मंडळाचे अध्यक्ष ओंकार लावंड अक्षय लावंड प्रणव लावंड शिवम जाधव रशीद आतार परवेज आतार यांच्यासह अनेक हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्रितपणे दहा दिवस गणेश उत्सव साजरा करत आहेत काही दिवसांपूर्वी या मंडळाचे अध्यक्ष अभिजीत लावंड यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने यंदा कोणताही कार्यक्रम साजरा न करता केवळ गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून परंपरा कायम ठेवले असल्याचे विद्यमान अध्यक्ष ओंकार लावंड यांनी सांगितले .