राष्ट्रीय ओबीसीं महासंघाचे चिमूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

138

🔸ओबीसी संघटना व सर्व जातीय संघटनांचा सहभाग

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.26सप्टेंबर):-राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी व सर्व जातीय संघटना यांनी ओबीसी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी मागील 15 दिवसापासून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून चिमूर तालुक्यात तहसील कार्यालय समोर मंडपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

एक दिवसिय लाक्षणिक उपोषनाला ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती पोट जातीचे व सर्व पक्ष्याचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी उपस्थिती दर्शविली. ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, महाराष्ट्र सरकारने बिहार राज्याच्या धरतीवर जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विध्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींकरीता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी यासह अनेक मागण्याचे निवेदन चिमूरचे तहसिलदार यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले.

एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणाऱ्या आंदोलन तब्बल पांधरा दिवस रविंद्र टोंगे यांचे चंद्रपूर येथे उपोषण सुरू होते याची दखल शासनाने घेतली नाही आणि आता संपुर्ण जिल्ह्यात ओबीसींचे आंदोलन तीव्र होत असून येणाऱ्या 30 सप्टेंबर ला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे संचालन रामदास कामडी, प्रास्ताविक प्रभाकर लोथे, आभार प्रदर्शन कवडू लोहकरे यांनी केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघचे तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे व इतर शेकडो ओबीसी बांधव तसेच सर्व समाजातील प्रतिनिधी ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते.