नगर परिषद प्रशासन संचालनालाय नवी मुबंई यांचे नियोमोचित कार्यवाही करण्याचे आदेश

72

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26सप्टेंबर):- नगर परिषद कार्यालयात पाच लिपिकांच्या अवैधरित्या पदोन्नती पद स्थापना देण्यात आलेली ही पदोन्नती पद स्थापना रद्द करण्यात याव्यात या साठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटना चे राज उपाध्येक्ष भ. ना. बोडके यांनी दिनांक 25 सप्टेंबर 23 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अमरण उपोषणचा आज दुसरा दिवस असून उपोषणाची दखल नगर परिषद प्रशासन संचालनालाय नवी मुबंई घेतली असून, जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन विभाग जिल्हा अधिकारी परभणी यांना गंगाखेड नगर परिषद मधील पाच लिपिकांच्या अवैधरित्या पदोन्नती पद स्थापना देण्यात आलेली ही पदोन्नती पद स्थापना रद्द करण्यात याव्यात.

या साठी आपल्या स्तरावरून नियोमोचित कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालायस तात्काळ सादर करावा आसे पत्रात आदेश देण्यात आले आहेत.