ओबीसीची प्रवर्गाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करा-ओबीसी फाउंडेशन इंडिया यांची वतीने केली मागणी

293

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27सप्टेंबर):-गंगाखेड येथील ओबीसी फाउंडेशन इंडिया यांनी निवेदन द्वारे तहसीलदार, तहसील कार्यालय गंगाखेड जि. परभणी यांच्यामार्फत एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे मागणी केली आहे.

भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाले असता तरीपण ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही, ओबीसी समजावर अन्याय सुरुच आहे, महाराष्ट्र सरकारने 31जुलै 2019 रोजी एक आदेश काडून ओबीसी वर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण कमी केले आहे. त्यामुळे सकल ओबीसी समाजात असंतोष निर्माण झालाआहे. त्या मुळे केंद्र व महाराष्ट्र सरकारने यांनी 31जुलै 2019 रोजी ओबीसी आरक्षण विरोधातील अध्येआदेश रद्द करावा तसेच प्रत्येक जिल्हात ओबीसी मुलांचे व मुलीचे स्वतंत्र हॉस्टेल देण्यात यावे, महाविद्यालय व विद्यापीठातील सूक्षम आरक्षण धोरण रद्द करावे. आसे निवेदन ओबीसी फाउंडेशन इंडिया यांची वतीने देण्यात आले आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा अन्यथा सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील याची जबाबदारीं शासनावर राहील आसे निवेदन द्वारे मागणी केली आहे.

निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया, माधव इंगळे अध्यक्ष ओबीसी वडार समाज मराठवाडा,अशोक मुकुटे ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष महाराष्ट्र,बालासाहेब सूर्यवंशी उपाध्यक्ष भटक्या मुक्ती ओबीसी महाराष्ट्र, भगीरथ फड जिल्हाध्यक्ष सरपंच ओबीसी परभणी, बाळासाहेब लटपटे महाराज अध्यक्ष वारकरी संप्रदाय ओबीसी गंगाखेड, अशोक जाधव सामाजिक कार्यकर्ते ओबीसी,रोहिदास लांडगे सामाजिक कार्यकर्ते, प्रवीन डहाळे तालुकाध्यक्ष सोनार समाज ओबीसी, बापूराव हुंडमुळे जिल्हा अध्यक्ष ओबीसी धनगर समाज, सदाशिव कुंडगीर तालुकाध्यक्ष ओबीसी धनगर समाज, डॉ.लहू जाधव दत्तर असोसिएशन ओबीसी डॉ. फाउंडेशन अध्यक्ष, रावसाहेब जाधव तालुकाध्यक्ष ओबीसी वडार समाज गंगाखेड, संजय कापसे तालुकाध्यक्ष वाणी समाज ओबीसी,अविनाश मानावा लपटे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.