जिल्हा कौशल्य विकास या योजनेतून रोजगार मेळवा-‘निर्णय आपला, सहकार्य आमचे’- भाग्यश्रीताई हालगेकर (आत्राम)

175

🔹राष्ट्रवादीच्या रोजगार मेळाव्यात उमटली महिलांची गर्दी

✒️विजय तोकला(सिरोंचा,तालुका प्रतिनिधी)मो:-9403477377

सिरोंचा(दि.27सप्टेंबर):-बेरोजगारी ही मोठी समस्या असली तरी काम करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या युवक-युवतींना कौशल्य विकास योजनेतून मार्ग निघू शकतो, निर्णय आपला, सहकार्य आमचे’ हे आमचे धोरण असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई हालगेकर (आत्राम) यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, बँक ऑफ इंडिया मार्गदर्शन केंद्राच्या वतीने तालुक्यातील कुशल, अकुशल तरुणांकरिता ना.धर्मरावबाबा आत्राम (अन्न व औषधी प्रशासन) कॅबिनेटमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोजगार मेळावा स्नेहधर्म सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिरोंचा तालुक्यातील दहावी, बारावी, पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय उत्तीर्ण व बेरोजगार युवती-युवकांसाठी जिल्हा बँक ऑफ इंडियाच्या वतीने मार्गदर्शन करण्यासाठी श्री.हेमंत मेश्राम प्रमुख उपस्थित होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना म्हणाले, आपल्याला या रोजगार मेळावा अंतर्गत रोजगार कसा घेता येते.

जिल्हा कौशल्य विकास योजना अंतर्गत आपल्याला लाभ घेता येतो यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त नगरसेवक श्रंजितभाऊ गागापुरपू यांनी केले.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी, रा.युवती कांग्रेसचे जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ.वेंकटलक्ष्मी आरवेल्ली, रा.कांग्रेचे महिला तालुका अध्यक्ष मनीषा चल्लावार, नवनियुक्त नगरसेविका सौ.सपना सम्मय्या तोकला, उपसरपंच श्री. नागराजू गणपती,रा.युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम. डी. शानु, कट्टर बाबासमर्थक रवी कारसपल्ली, सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ सुलतान आणि रा.का.पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.