महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,गंगाखेड शाखा नवीन कार्यकारिणी घोषीत

99

✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.२९ सप्टेंबर):-रोजी गंगाखेड येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृहात राज्यकार्यकारी समिती सदस्य मुंजाजी कांबळे यांच्या उपस्थितीत नवीन शाखा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी मुंजाजी कांबळे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका व चतुसूत्री सांगून पदाधिकारी यांची भूमिका व जबाबदारी काय असावी याविषयी माहिती देण्यात आली.
सदरील बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

अध्यक्ष: प्रा सतीश कसबे, उपाध्यक्ष: आनंद सातपुते, कार्याध्यक्ष: प्रकाश शिंगाडे, प्रधान सचिव: महेमूद शेख व पौळ ए एन कायदेविषयक सल्लागार अडव्होकेट उत्तम काळे,विविध उपक्रम:नरेंद्र भालेराव, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प: शिवदास जाधव व सूर्यकांत तुपेकर, बुवाबाजी संघर्ष,प्रसाद पवार,वार्तापत्र,राहुल साबणे,सांस्कृतिक,शिलवंत कांबळे, युवा सहभाग:दिलीप कांबळे, महिला सहभाग,सूर्यमाला मोतीपवळे, प्रशिक्षण विभाग,मोतीराम चौरे, मानसमित्र व व्यसनमुक्ती:विनायक पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.निवडीनंतर पदाधिकारी यांना अंनिसचे पुस्तके देवून स्वागत करण्यात आले.