आयडियल इंग्लिश शाळेत ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्त “प्रेषित मोहम्मद आमचे आदर्श” भाषण स्पर्धा संपन्न

93

✒️परळी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

परळी(दि.29सप्टेंबर):-शहरातील आयडियल इंग्लिश शाळेत १२ रबी-उल-अव्वल अर्थातच ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने “प्रेषित मोहम्मद आमचे आदर्श” या विषयावर भाषण स्पर्धांचे आयोजन आज दिनांक २७ सप्टेंबर २०२३ बुधवारी शहरातील पाशा सर‌ गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती

या स्पर्धेत शाळेतील असंख्य विद्यार्थींनी सहभआऐ नोंदवला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव हाजी खदीर सहाब,अध्यक्ष सरताज खान सहाब, संस्थेचे सदस्य शेख कलीम, अमजद खान, शेख रफीक, शेख तनवीर उपस्थित होते
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचं शिक्षक व‌ शिक्षकांनी परिश्रम घेतले होते