गंगाखेड तालुक्यात डोंगरपिंपळा येथे वीज पडून आई व मुलीचा जागीच मृत्यू

138

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29सप्टेंबर):-तालुक्यातील आज दिनांक 29 सप्टेंबर 23रोजी बहुतांश भागात मुसळधार पाऊसाने मेघ गर्जना व विजाच्या कडकडाट सह सायंकाळी चार वाजता हजेरी लावली असता. याच दरम्यान गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील शेत आखाडयावर आज सायंकाळी चार वाजता वीज पडल्या मुळे आई सह मुलीचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या मुलगा मात्र सुदैवाने बचावला.

या बाबत सविस्तर माहिती अशी की आज दुपारी तीन वाजता मेघ गर्जना व विजाच्या कडकडाट सह पावसाने सुरवात केली असता या दरम्यान सायंकाळी चार च्या दरम्यान गंगाखेड तालुक्यातील डोंगरपींपळा येथील शेतकरी विठ्ठल दत्तराव कतारे यांच्या शेतात आखाड्यावर वीज पडली असता या दुर्घटना मध्ये विठ्ठल दत्तराव कतारे यांची पत्नी सविता वय वर्षे (40)व मुलगी वय वर्ष(18)या दोघींचा जागीच मृत्यू झाला परंतु त्यांच्या सोबत असलेल्ला मुलगा सुदैवाने दुर्घटनेतून बचावला.